Why Rishabh Pant Ignored Arjun Tendulkar: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२६ चा हंगाम आता आणखीच रोमांचक झाला आहे. सध्या प्लेऑफची चुरस आणखीच रंगली आहे. मात्र आयपीएल २०२६ चा हंगाम हा लखनऊ सुपर जायंट्स (LSG) आणि ऋषभ पंतसाठी (Rishabh Pant) फारसा चांगला ठरलेला नाही. १९ व्या हंगामात त्याच्या कर्णधारपदावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सोमवारी रात्री वानखेडे मैदानावर मुंबई इंडियन्सकडून (MI) पराभूत झाल्यानंतर लखनऊ संघाला सलग सहावा आणि एकूण सातवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे संघावरील टीका आणखी वाढली आहे.
क्रिकबझशी बोलताना माजी क्रिकेटपटू रोहन गावस्कर यांनी पंतच्या मेगा लिलावातील करारानंतर लगेचच २०२५ च्या हंगामाच्या सुरुवातीला लखनऊ संघाचे मालक संजीव गोयंका यांनी बाळगलेल्या मोठ्या अपेक्षांबद्दल भाष्य केले. गोयंका यांना अशी आशा होती की पंतचे नाव लवकरच एमएस धोनी आणि रोहित शर्माच्या पंक्तीत आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये घेतले जाईल. मात्र आतापर्यंत पंत त्या अपेक्षा पूर्ण करू शकलेला नाही.
Mumbai Indians Need This 3 Changes: कर्णधार बदला, दोन खेळाडूंना बाहेरचा रस्ता अन्... ७ सामने राहिलेत, लवकर पाऊल उचला...पॅनेलचा भाग असलेल्या मनोज तिवारी यांनी ५ वेळा आयपीएल जिंकणारे कर्णधार एमएस धोनी आणि रोहित शर्मा यांच्या तुलनेत पंतच्या नेतृत्वात उणीवा असल्याचे म्हटले. मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बोलताना तिवारी म्हणाले की लखनऊचा प्रिन्स यादव हा चांगला गोलंदाज आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात जेव्हा इतर गोलंदाज १२ च्या सरासरीने धावा देत होते, तेव्हा प्रिन्सने चांगली गोलंदाजी करत आपल्या षटकांमध्ये धावांवर नियंत्रण ठेवले.
पुढे ते म्हणाले की त्याने यॉर्करवर अधिक भर दिला आणि अशी रणनीती टी-२० क्रिकेटमध्ये अत्यंत प्रभावी ठरते. कर्णधार म्हणून पंतने याकडे लक्ष द्यायला हवे होते आणि संघातील इतर गोलंदाजांनी प्रिन्ससारखी गोलंदाजी का केली नाही याचाही विचार करायला हवा होता. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की पंतने अर्जुन तेंडुलकरला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून संघात घेण्याचा विचार करायला हवा होता.
तिवारी पुढे म्हणाले की, “लखनऊने सोशल मीडियावर पोस्ट केलेले व्हिडिओ मी पाहिले आहेत, ज्यामध्ये अर्जुन तेंडुलकर नेट्समध्ये यॉर्कर टाकताना दिसत होता. त्यामुळे पंत त्याला संघात घेऊ शकला असता. कर्णधार म्हणून रोहित शर्मा आणि एमएस धोनी हे इथे वेगळे ठरतात.” हंगाम सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून ३० लाख रुपयांत ट्रेड झाल्यानंतरही अर्जुन तेंडुलकरला या हंगामात लखनऊकडून अद्याप एकही सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
IPL 2026: रोहित शर्माची दुखापत ते बुमराह - बोल्टचं अपयश... Mumbai Indians प्लेऑफमधून बाहेर पडण्याची ५ महत्त्वाची कारणं काय?एकूणच अर्जुनने ५ हंगामांमध्ये केवळ ५ आयपीएल सामने खेळले असून त्याने २०२३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मुंबईकडून पदार्पण केले होते. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आपली पहिली विकेट घेतली होती आणि त्या हंगामात आणखी दोन विकेट्सही मिळवल्या होत्या. त्यानंतर पुढील वर्षी त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.