नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट
शुभम खैरनारची सीबीआयकडून चौकशी
६०० मार्क्सची खात्री देत शुभमने पेपर फोडला
१२ लाख रुपयांना विकली प्रश्नपत्रिका
नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या नाशिकच्या शुभम खैरनारने केलेल्या गुन्ह्याबाबत धक्कादायक माहिती तपासातून उघड झाली आहे. ६०० गुणांची खात्री देतो असा विश्वास शुभम खैरनारने नीट पेपर फोडण्यापूर्वी व्यक्त केला होता. त्यासाठी त्याने १० ते १२ लाख रुपये घेतले असल्याची माहिती तपास यंत्रणेतील सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणात पोलिसांनी शुभमचा मोबाइल जप्त केला होता त्यामधील मेसेजमधून देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या नांदगावमधील शुभम खैरनारला नीट पेपर फुटीप्रकरणी पोलिसांनी अटक केली असून सीबीआयने त्याला दिल्लीला नेले आहे. त्याठिकाणी शुभमची सीबीआयकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ५०० ते ६०० गुणांची खात्री देतो असा विश्वास पेपर फोडण्यापूर्वी शुभम खैरनारने व्यक्त केला होता. प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळणार अशी खात्री शुभमने दिली होती. तपास यंत्रणेतील सूत्रांनी ही माहिती दिली.
NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी कारवाई, महाराष्ट्रातून आणखी दोघांना बेड्यानीट परीक्षेचा पेपर फोडण्यापूर्वी शुभम खैरनारचे इतर आरोपींना अनेक मेसेज गेले होते. २९ एप्रिल रोजी पेपर फोडण्याचा व्यवहार ठरला होता. शुभमच्या मोबाईलमधून चॅट्स, लीक झालेले प्रश्नपत्रिका आणि इतर डिजिटल पुरावे सीबीआयने जप्त केले. नाशिकचा शुभम खैरनार, जयपूरचा मांगीलाल बिवाल, गुडगावचा यश यादव, विकास बिवाल आणि दिनेश बिवाल या ५ जणांना सीबीआयने अटक केली आहे. त्यांना ७ दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात आली आहे.
NEET UG 2026: NEET ची पुन्हा परीक्षा कधी होणार? फी किती? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवरआरोपी मांगीलाल बिवालने तपास यंत्रणांना सांगितले की, माझ्या मुलासाठी १० ते १२ लाख रुपयांना नीट परीक्षेचा पेपर फोडण्यात आला. एप्रिल महिन्यात मांगीलालने शुभमकडे प्रश्नपत्रिकेची मागणी केली होती. नाशिकच्या शुभमला पेपर फोडण्यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. शुभम १० ते १२ लाख रुपयांना पेपर फोडायचा आणि जयपूरला पाठवायचा. सीबीआयचे तपास चक्र त्या ५ जणांभोवती फिरत आहे. या पाचही आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. शुभमने याबाबत यशला कळवल्यानंतर २९ एप्रिल रोजी रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राचा पेपर १० लाख रुपयांना मांगीलालला मिळाला होता.
मोठी बातमी! NEET पेपरफुटीचं लातूर कनेक्शन उघड; सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घराची झडती; मोबाईल आणि कागदपत्रे ताब्यातContact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.