सध्या सोशल मीडियावर एका दाक्षिणात्य चित्रपटाची जोरदार चर्च आहे तो म्हणजे दिग्दर्शक हार्दिक गज्जार यांचा नवा चित्रपट 'कृष्णावतारम पार्ट १: हृदयम'. हा चित्रपट ७ मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. तेव्हापासून हा चित्रपट सतत चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. या पौराणिक चित्रपटात भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ गुप्तासोबतच चित्रपटातील 'राधा'ची जोरदार चर्चा आहे जी सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिचं सौंदर्य, मनमोहक हास्य आणि दमदार अभिनयाचं सगळीकडे कौतुक होत असून ती सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
एकेकाळी बी.आर. चोप्रा यांच्या 'महाभारत'मध्ये पारिजात यांनी साकारलेली राधा गाजली होती, आता २१ व्या शतकातील राधिका म्हणून अभिनेत्री सुष्मिता भट प्रकाशझोतात आली आहे. महत्वाचं म्हणजे सुष्मिताचं वय ३२ वर्ष आहे. तरीही तिने सुंदर अशी राधा साकारत सगळ्यांना प्रेमात पाडलंय. वय हा फक्त आकडाच आहे हे तिने सिद्ध केलंय. मात्र सुष्मिता ही बॉलिवूडची नाही तर दाक्षिणात्य अभिनेत्री आहे.
View this post on Instagram
A post shared by Krishnavataram (@krishnavataramthemovie)
कोण आहे सुष्मिता भट?
सुष्मिता भट ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सुमेध के. यांनी संगीतबद्ध केलेल्या 'तुलसी' गाण्याच्या यशानंतर तिला खरी ओळख मिळाली. सुष्मिता केवळ एक उत्तम अभिनेत्रीच नाही, तर ती एक निष्णात क्लासिकल डान्सर देखील आहे. मल्याळम सुपरस्टार ममूटी यांच्या चित्रपटातील 'मार्गाजी' या गाण्यात सुष्मिताने केलेल्या नृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिने ममूटी, मोहनलाल आणि विक्रम प्रभू यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. यापूर्वी तिला 'कलजिगा' आणि 'चाउ चाउ बाथ' सारख्या चित्रपटांतील अभिनयासाठी गौरवण्यात आले आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक गौतम वासुदेव मेनन यांनीही मल्याळम चित्रपट 'डोमिनिक अँड द लेडीज पर्स' मधून यशस्वी पदार्पण केले आहे, ज्यात ममूटी यांनी सीआय डोमिनिकची भूमिका साकारली आहे. सुष्मिताने आपल्या अभिनय प्रवासाची सुरुवात तेलगू चित्रपट 'नाट्यम' मधून केली होती. कन्नड सिनेमात स्वतःचे स्थान निर्माण केल्यानंतर तिने विक्रम प्रभूंसोबत तमिळ चित्रपट 'लव मॅरेज'मध्ये काम केले. याशिवाय मल्याळममधील 'डोमिनिक अँड द लेडीज पर्स' आणि 'डीज इराए' यांसारख्या चित्रपटांतही तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 'कृष्णावतारम' हा तिचा पहिला हिंदी चित्रपट आहे.
'सॅकनिल्क'च्या (Sacnilk) अहवालानुसार, हार्दिक गज्जार दिग्दर्शित 'कृष्णावतारम पार्ट १' या चित्रपटाने पहिल्या ६ दिवसांत ८.७६ कोटी रुपयांचे नेट कलेक्शन आणि १०.४६ कोटी रुपयांचे ग्रॉस कलेक्शन करत बॉक्स ऑफिसवर समाधानकारक कामगिरी केली आहे. या चित्रपटाने पहिल्या रविवारी (चौथ्या दिवशी) ३.५५ कोटी आणि सोमवारी १.३५ कोटी रुपयांची कमाई केली, तर सहाव्या दिवशी म्हणजेच मंगळवारी सुरुवातीच्या अंदाजानुसार ४ लाख रुपयांचा गल्ला जमवला.
बुकिंग केलेली गाडी आम्ही नागराज मंजुळेंमुळे कॅन्सल केली, अरबाज शेखने सांगितला किस्सा, म्हणाला, 'ऐनवेळेला निर्णय बदलला...'Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.