ढेबेवाडी: गावातील पाणी टंचाईमुळे कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या तीन महिलांसह दोन मुलींवर मधमाश्यांनी जीवघेणा हल्ला केला. पाळशी (ता. पाटण) येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली. या हल्ल्यात तीन महिला जागीच बेशुद्ध पडल्या. येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

farmer Success Story: पहिल्याच वर्षी 20 टन केशर आंब्याचे उत्पादन; मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या शेतात बहरली आंबराई!

मिळालेल्या माहितीनुसार, पाळशी परिसरात सध्या पाण्याचे भीषण संकट आहे. गावात पाणी नसल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास गावातील महिला कपडे धुण्यासाठी नदीकडे निघाल्या होत्या.


‘धनगर गवन’ शिवारात पोहोचताच अचानक तेथील आग्यामोहाच्या मधमाश्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. माश्यांचा दंश इतका तीव्र होता, की यात तीन महिलांना असह्य वेदना होऊन त्या जागीच बेशुद्ध पडल्या. यावेळी जवळच असलेल्या शुभम माने याने प्रसंगावधान राखत आरडाओरडा केला. त्यामुळे गावकरी तातडीने मदतीला धावून आले.

Raj Thackeray: राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख सदावर्तेंना भोवला; “जरा जपून फिरा” म्हणत राजू पाटलांचा इशारा, रवींद्र चव्हाणांनाही टोला..

ग्रामस्थांनी तातडीने जखमींना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये सुनीता संदीप माने (वय ४०), यशोदा आत्माराम सावंत (वय ६०), शांताबाई रघुनाथ माने (वय ६०), आरोही संदीप माने (वय १२), दूर्वा सचिन माने (वय सात) यांचा समावेश आहे. वैद्यकीय सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.