Rajnikant Jailer 2 Accident: दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ (Jailer 2) चित्रपटाच्या सेटवर एक भयंकर घटना घडली आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एका क्रू मेंबरचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका खासगी स्टुडिओमध्ये ‘जेलर 2’च्या सेटचं काम सुरू असताना हा अपघात झाला. सेट बांधकामादरम्यान अचानक विजेचा धक्का बसल्याने कार्तिकेयन नावाच्या क्रू मेंबरचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. (Rajnikant Jailer 2 Set Accident)
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, सेटवरील बांधकाम सुरू असताना अचानक विजेचा धक्का बसला. यामध्ये कार्तिकेयन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने मदत करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण तोपर्यंत त्याचा जागीच मृत्यू झाला होता . कनथूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून अद्याप FIR दाखल करण्यात आलेली नाही. सेटवर विजेचं लिकेज कसं झालं? सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये निष्काळजीपणा झाला होता का? याचा शोध पोलिस घेत आहेत.
‘जेलर 2’ हा दिग्दर्शक नेल्सन दिलीपकुमार आणि रजनीकांत यांचा एकत्रित दुसरा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती सन पिक्चर्स करत असून कंपनीचे मालक कलानिधी मारन आहेत. मात्र, या दुर्दैवी घटनेबाबत चित्रपटाच्या टीमकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही.
दरम्यान, ‘जेलर’च्या (Jailer2) यशानंतर ‘जेलर 2’ची प्रचंड उत्सुकता पाहायला मिळतेय.‘जेलर 2’ हा 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘जेलर’चा सिक्वेल आहे. पहिल्या चित्रपटाने जगभरात 600 कोटी रुपयांहून अधिक कमाई करत मोठं यश मिळवलं होतं. या नव्या भागात रजनीकांत पुन्हा एकदा ‘टायगर’ मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत दिसणार आहेत. अभिनेत्री रम्या कृष्णन त्यांच्या पत्नी विजयाच्या भूमिकेत पुनरागमन करणार आहेत. तसेच शिवा राजकुमार आणि मोहनलाल यांचे कॅमिओही चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. अभिनेते मिथुन चक्रवर्ती देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.मात्र, ‘जेलर 2’च्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
:
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.