पुणे : एका ७० वर्षीय वृद्धाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी लोहगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

Karad News: कृष्णा काऱखान्याचा निवडणुक कार्यक्रम जाहीर ; २१ जुनला मतदान; १८ मे पासुन दाखल करता येणार उमेदवारी अर्ज

पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून, घटनेमागील नेमकी परिस्थिती जाणून घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.


भोर तालुक्यातील नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार आणि खुनाच्या घटनेनंतर समाजात संताप व्यक्त केला जात आहे. असे असतानाच शहरात एका वृद्धाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.