पुणे: श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गात आडकाठी आणणाऱ्या स्थानिकांची समजूत काढा. त्यांच्या विरोधाचा फटका महामार्गाला बसत आहे. तर संबंधित ठेकेदारांनीदेखील कामात कसूर केल्याने त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना दिल्या.


स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या कामास विरोध केल्याने बारामती ते इंदापूर दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील सुमारे ३० टक्के काम अपूर्ण राहिल्याने नितीन गडकरी यांनी आक्रमक पवित्रा घेतला. श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी पाहणी केली. यावेळी बसमध्ये कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते.

Pune Crime : प्रेमसंबंध लपवून दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न; आरोपीला अटक

तुकाराम महाराज पालखी मार्गाचे काम तीन टप्प्यात केले जात आहे. पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर आणि इंदापूर ते तोंडले अशा ३ पॅकेजमध्ये या मार्गाचे बांधकाम सुरु आहे. यापैकी पाटस ते बारामती हा भाग पूर्ण झाला असून, इंदापूर ते तोंडले भागाचे काम ९६ टक्के पूर्ण झाले.


मात्र, बारामती ते इंदापूर या ४२. १३ किलोमीटरच्या कामाला विविध कारणांमुळे विरोध होत असल्याने सुमारे ३० टक्के काम रखडले आहे. उर्वरित काम पूर्ण होण्यास आणखी किमान चार ते पाच महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. यावेळी आमदार राहुल कुल उपस्थित होते.

Premium|Anglo-American Historical Relations : इंग्लंड आणि अमेरिका; सशस्त्र संघर्षापासून स्वाभाविक मित्रत्वापर्यंतचा ऐतिहासिक आणि राजकीय प्रवास

पालखी मार्गावर ज्या ठिकाणी कामास स्थानिकांचा विरोध नाही. त्या ठिकाणी देखील ठेकेदारांनी काम केलेले नाही. यावर नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त करीत संबंधित ठेकेदार कारवाईचे आदेश दिले. कामाचे कंत्राट व्हीएनसी -आर. के. चव्हाण यांच्यासह कामठे यांना देण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना संबंधित ठेकेदारांवर कारवाईचे आदेश प्राप्त झाले असल्याची माहिती वरिष्ठअधिकाऱ्याने दिली.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.