CJI News : सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी एका सुनावणी दरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.सरन्यायाधीश सूर्य कांता आणि न्यायमूर्ती जाॅयमाल्य बागची यांच्या खंडासमोर एका वकिलाने वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यासंदर्भात याचिका केली होती.
या याचिकेच्या सुनावणी दरम्यान, त्या वकिलावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. त्यांनी काही बेरोजगार तरुणांची तुलना झुरळांशी केली अन् ते पुढे म्हणाले की, असे बेरोजगार तरुण पुढे जाऊन पत्रकार, समाज माध्यम, आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि व्यवस्थेवर हल्ले करतात.
याचिका करणाऱ्या वकिलाचे सोशल मीडियावरील लेखन पाहून सरन्यायाधीश म्हणाले की, समाजामध्ये पॅरासाईड (परजीवी) कमी नाहीत जे व्यवस्थेवर हल्ला करतात. तुम्हीला त्यांच्यात सामील व्हायचे आहे का?
याचिका करणाऱ्या वकिलाने फेसबूकवर वापरलेली भाषा त्यांची वरिष्ठ म्हणून नियुक्ती करण्यास योग्य नसल्याचे मत न्यायालयाने नमूदन केले. तसेच सरन्यायाधीशांनी म्हटले की, ते फेसबूक जे लिहितात, पोस्ट करतात त्यांना वाटते व्यवसायिक शिस्त काय असते ते मी दाखवतो.
Maharashtra News Live Update: राज्य सरकारचा 'आयएलएस' महाविद्यालयाला दणका, विद्यार्थ्यांकडून घेतलेले शुल्क व्याजासह परत करण्याचे निर्देशदरम्यान, वकिलाला खडे बोल सुनावत सरन्यायाधीश म्हणाले की, कदाचित सगळेच जग वरिष्ठ वकील पदासाठी पात्र ठरेल मात्र तुम्ही या पदासाठी पात्र नाही. जर दिल्ली न्यायालयाने वरिष्ठ वकील म्हणून तुमची नियुक्ती केली असती तर सर्वोच्च न्यायालय म्हणून आम्ही तो निर्णय रद्द केला असता.
Supreme Court : खळबळजनक घटना, अधिकाऱ्यांना 9 तास कोंडले! सरन्यायाधीश प्रचंड संतापले, स्वत: मध्यरात्री 2 वाजेपर्यंत होते लक्ष ठेऊन...Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.