Nagpur Crime News : नागपूर शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने तोंडवर काढलं आहे का? असा प्रश्न आता सर्वसाधारण नागपूरकरांना पडला आहे. कारण नागपूरच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महालाच्या कोठीरोड परिसरात गोळीबाराची (Nagpur Crime News) घटना घडली आहे. रविवारच्या रात्रीच्या सुमारास घडलेलंय या घटनेमुळे शहरात एकच खळबळ (Crime News) उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री साडे अकरा ते बाराच्या सुमारास हि घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
Nagpur Crime : तीन बाईकवर आलेल्या सहा जणांनी दोनदा केलं फायरिंग
मिळालेल्या माहितीनुसार, तीन बाईकवर आलेल्या सहा जणांनी दोनदा फायरिंग केल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ नावाच्या फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे रवी मोहतो, गंगा काकडे यांनी फायरिंग केल्याची माहिती आहे. वर्चस्व, दहशत पसरविण्यासाठी हि फायरिंग केल्याचे बोललं जात आहे. दरम्यान, यातील संशयित आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून अमली पदार्थ विक्री आणि बाळगण्याचे त्यांच्यावर गुन्हे आहेत. त्यांच्यातील अंतर्गत वादातून हि फायरिंगची घटना घडल्याचे बोलले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे. नागपूरच्या संघ कार्यालयापासून अवघ्या दिड किलोमीटर अंतरावर हि घटना घडल्याने परिसरात भीतीच वातावरण निर्माण झालं आहे. सध्या पोलीस या प्रकारणाचा तपास कोतवाली पोलीस करत असून तपासाअंती या प्रकरणाचे सत्य समजू शकणार आहे.
Nagpur Crime News : एकच ठिकाणी चार दिवसात दोघांची दगडाने ठेचून हत्या
दुसरीकडे, नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माधवनागरी परिसरात एकच ठिकाणी चार दिवसात दोघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे. रविवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास अंकुश शेंडे याची अज्ञात आरोपीने दगडाने ठेचून हत्या केलीय. अंकुश हा मजूर असून त्याला दारूचे वेसण होते. तर गुरुवारी याच ठिकाणी आकाश बरडे याची देखील अशाच पद्धतीने दगडाने ठेचून हत्या करण्यात आली होती. दोन्ही घटनेचा एकमेकांशी संबंध नसल्याचे पोलीस सांगत असले तरी दोन्ही मृतक हे एकाच इसासनी भागात राहत होते. दोन्ही हत्येचे घटना स्थळ एकच आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आता वेगवेगळे तर्कवितर्क काढले जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.