नाशिक : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी धक्कादायक खुलासा समोर आले आहेत. अशोक खरातने (Ashok Kharat Nashik Crime News) अटकेपूर्वी बनावट खात्यांमधून संशयास्पद व्यवहार केले असल्याची माहिती चौकशीमध्ये समोर आली आहे. तीन महिन्यांत बेनामी खात्यांतून ५२ कोटी काढून भोंदू खरातचा (Ashok Kharat Nashik Crime News) पलायनाचा प्लॅन होता अशी सूत्रांची माहिती आहे. काळा पैसा पांढरा करण्यासाठी आणि उत्पन्न करपात्र होऊ नये, यासाठी बँकिंग नियमातील २ लाख मर्यादेची पळवाट देखील खरातने शोधली होती.(Ashok Kharat Nashik Crime News)
कोपरगावच्या एकट्या समता पतसंस्थेत ६५ बनावट खाती उघडून जानेवारीत चार दिवसात २०० हून अधिक व्यवहारांद्वारे ५२ कोटी रुपये काढून त्याचा परदेशात पलायनाचा प्लॅन असल्याचं देखील उघड झालं आहे. या बनावट खात्यांमध्ये दोन महसूल आणि दोन आरटीओ अधिकाऱ्यांच्या नावे तसेच चाकणकर यांच्यासह अनेक प्रतिष्ठित कुटुंबातील सदस्यांच्या नावेही खाती असल्याची माहिती समोर आली आहे. (Ashok Kharat Nashik Crime News)
केंद्रीय यंत्रणांकडून खातेदारांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. डिसेंबर २०२५ मध्ये वावी पोलिस ठाण्यात खरातने राजेंद्र जासूद आणि परबविरोधात तक्रार दाखल केल्यावर जानेवारीनंतर ते मार्चमध्ये अटक होईपर्यंत त्यातून ५२ कोटी रुपये काढले. ५ दिवसांत वेगवेगळ्या खात्यांमधून प्रत्येकी १.९९ लाख काढले. एकूण ६५ खात्यांमध्ये एकाच तारखेला १ लाख ९९ हजार रुपयांचे व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. ही सर्व खाती हाताळणारा आणि नॉमिनी अशोक खरात असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरातला पोलिसांच्या अटकेची दाट शक्यता वाटू लागली होती. त्यामुळे स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याने न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात पळून जाण्याची जय्यत तयारी केली होती. खरातचे परदेशात अनेक संबंध असल्याने तिथे स्थायिक होऊन पोलिसांच्या हातावर तुरी देण्याचा त्याचा प्रयत्न होता. (Ashok Kharat)
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला अशा अनेक भाकडकथा त्याने पसरवल्या होत्या. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जात होता. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतरच्या तपासात खरातचे अनेक काळे कारनामे समोर आले आहेत.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.