ठाणे: ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी पुण्यातील धनकवडी येथील टीडीआर प्रकरणावरून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत शासनाचा जीवनगौरव पुरस्कार परत केला. ठाण्यातील आनंदाश्रम येथे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर हा पुरस्कार ठेवून त्यांनी संताप व्यक्त केला. "आयुष्यभर महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी काम केले, तरीही न्यायासाठी दरवाजे ठोठवावे लागत आहेत," अशा शब्दांत त्यांनी खंत व्यक्त केली.


उषा चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, कुटुंबीयांच्या मालकीची पुण्यातील धनकवडी येथील जमीम अद्याप अविभाजित असताना आणि न्यायालयाने त्यांचा मुलगा हृदयनाथ कडू देशमुख यांचा हिस्सा मान्य केला असतानाही पुणे महापालिकेकडून खासगी विकसकाच्या फायद्यासाठी 'टीडीआर' मंजूर करण्यात आला. न्यायालयीन आदेश आणि आमचे कायदेशीर हक्क दुर्लक्षित करण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री शिंदेंकडून व्यवहाराला स्थगिती

उषा चव्हाण यांनी शिवसैनिकांसमोर आपली व्यथा मांडल्यानंतर अभिनेते-निर्माते मंगेश देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवला. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डी. गोविंदराज यांच्याशी संपर्क साधून संबंधित टीडीआर व्यवहाराला तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश दिले.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.