पुणे: ‘‘मराठा समाजासाठी मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथ शिंदे यांनी जेवढे काम केले, ते महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही सरकारने केले नसावे. मराठा आरक्षण आणि समाजासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमध्ये राज्य सरकारने कोणतीही कपात केलेली नसून, उलट त्या अधिक ताकदीने राबविल्या जात आहेत,’’ असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला. तसेच शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

farmer Success Story: पहिल्याच वर्षी 20 टन केशर आंब्याचे उत्पादन; मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या शेतात बहरली आंबराई!

पुणे ॲग्री हॅकेथॉन कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, ‘‘मराठा समाजासाठी राज्य सरकारने विविध आर्थिक आणि शैक्षणिक योजना सुरू केल्या आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उद्योजक तयार झाले आहेत. स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजातील तरुणांना यश मिळावे, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना वसतिगृह सुविधा, निर्वाह भत्ता आणि इतर योजनांचा लाभ दिला जात असून, कोणतीही योजना बंद करण्यात आलेली नाही.’’


खासदार पार्थ पवार यांच्या भेटीबद्दल ते म्हणाले, ‘‘पार्थ पवार काल मला भेटले. काही प्रशासकीय तसेच काही राजकीय विषयांवर आमच्यात चर्चा झाली. आम्ही मित्रपक्ष असल्याने त्यांनी भेटायला येणे ही काही फार मोठी किंवा वेगळी घटना नाही.’


राज्यातील ऊर्जा संकटाच्या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘राज्यात कुठलेही ऊर्जा संकट नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त वीज उपलब्ध आहे.’’ अमली पदार्थांच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, ‘‘पंजाबसह इतर राज्यांतील परिस्थिती आणि महाराष्ट्रातील परिस्थिती याची तुलना केली, तर महाराष्ट्राची स्थिती अधिक चांगली असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा प्रकारे महाराष्ट्राला बदनाम करणे राजू शेट्टी यांना शोभणारे नाही. अमली पदार्थाचे देशासमोरील मोठे आव्हान आहे. देशभरात अमली पदार्थ विरोधी मोठी मोहीम सुरू आहे.’’

Raj Thackeray: राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख सदावर्तेंना भोवला; “जरा जपून फिरा” म्हणत राजू पाटलांचा इशारा, रवींद्र चव्हाणांनाही टोला..

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते म्हणाले ‘‘राज्यातील कांद्याची निर्यात बांगलादेश आणि आखाती देशांमध्ये होत नाही. उत्पादन जास्त आणि खरेदीदार कमी असल्याने दरावर परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करत साडे बारा रुपये दराने कांदा खरेदी सुरू केली आहे.’’

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.