राज्यात सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. एका बाजूला उष्णतेच्या लाटेने हैराण झाले असतानात दुसरीकडे काही भांगात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने सोमवार (18 मे) साठी महत्त्वाचा इशारा जारी केला आहे.


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाजआहे. दरम्यान, मराठवाड्यातील काही भागात उष्णतेची लाटही जाणवू शकते, त्यामुळे दुहेरी हवामानाचा अनुभव मिळणार आहे.

Monsoon Weather Alert : पुढचे ८ दिवस इशारा! पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस, विदर्भात उष्णतेची लाट; शेतकऱ्यांना कृषी विभागाचा महत्त्वाचा सल्ला किनारपट्टीसाठी इशारा

नैऋत्य अरबी समुद्र आणि सोमालिया किनाऱ्यावर वाऱ्याचा वेग 45-55 किमी/तास, झोत 65 किमी/तास असणार आहे तर केरळ, कर्नाटक किनारपट्टी आणि लक्षद्वीप परिसरात वाऱ्याचा वेग 40-50 किमी/तास तसेच झोत 60 किमी/प्रतितास असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा

तर दुसरीकडे विदर्भातील नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सकाळी 11 ते दुपारी 4:30 या वेळेत सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहेत तर शाळा, महाविद्यालये आणि आस्थापनांना खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

FAQs

1. सध्या राज्यात हवामान कसे आहे?
राज्यात उष्णतेची लाट आणि काही भागात पावसामुळे मिश्र (unstable) हवामान आहे.


2. कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे?
दक्षिण कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.


3. वाऱ्याचा वेग किती असू शकतो?
साधारणपणे 40 ते 50 किमी/तास वेगाने वारे वाहू शकतात.


4. मच्छिमारांसाठी काय सूचना आहेत?
जोरदार वाऱ्यामुळे समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


5. उष्णतेचा सर्वाधिक परिणाम कुठे आहे? (
विदर्भातील नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत उष्णतेचा येलो अलर्ट आहे.


6. नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
सकाळी 11 ते दुपारी 4:30 दरम्यान बाहेर पडणे टाळावे आणि पाणी पिणे व सावलीत राहणे आवश्यक आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.