-हेमंत पवार
कऱ्हाड: रेठरे बुद्रुक (ता. कऱ्हाड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सोमवारपासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. कऱ्हाडच्या मार्केट यार्डमधील उपनिबंधक कार्यालयाच्या शेजारील हॉलमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती कारखान्याच्या निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपनिबंधक अपर्णा यादव यांनी दिली.
farmer Success Story: पहिल्याच वर्षी 20 टन केशर आंब्याचे उत्पादन; मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या शेतात बहरली आंबराई!सातारा व सांगली या दोन जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या कृष्णा कारखान्याची निवडणुक यावेळी कारखान्याचे विद्यामान अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या आणि कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या गटामध्ये होईल अशी चिन्हे आहेत. दोन्ही गटांनी निवडणुकीसाठी तयारी केल्याचे दिसत आहे.
सहकार विभागाकडुन निवडणुक निर्णय़ अधिकारी म्हणुन उपनिबंधक अर्पणा यादव यांची नियुक्ती केली आहे. दोन आठवड्यापुर्वी मतदार याद्या अंतीम करण्यात आल्या होत्या. त्यानुसार कारखान्यासाठी ५० हजार २५२ मतदार सभासद आहेत. तर आजपासुन २२ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल झालेले अर्ज २६ मे नऊ जुन दरम्यान मागे घेण्याची मुदत आहे.
Raj Thackeray: राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख सदावर्तेंना भोवला; “जरा जपून फिरा” म्हणत राजू पाटलांचा इशारा, रवींद्र चव्हाणांनाही टोला..२१ जुनला मतदान होणार असुन २३ जुनला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान उद्यापासुन मार्केट यार्डमधील उपनिबंध कार्यालयाच्या शेजारील हॉलमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली असुन तेथे कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आल्याचे निवडणुक निर्णय़ अधिकारी यादव यांनी सांगीतले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.