सातारा: सातारा पालिकेच्या सभागृहात सुरू असणाऱ्या बेकीची दखल घेत सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी रविवारी त्यांचे नेतृत्व मानणाऱ्या नगरसेवकांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी नगरसेवकांना सभागृहात शिस्त पाळण्यासह दुजाभाव न करता एकोप्याने राहण्याच्या सूचना केल्या. याच बैठकीदरम्यान त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा करण्याचे संकेत दिले.
farmer Success Story: पहिल्याच वर्षी 20 टन केशर आंब्याचे उत्पादन; मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या शेतात बहरली आंबराई!सातारा पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष ॲड. डी. जी. बनकर आणि बांधकाम सभापती बाळासाहेब खंदारे यांच्यात वाद झाला होता. या वादामुळे पालिकेतील बेबनाव, कुरघोड्या, जिरवाजिरवीच्या राजकारणाच्या चर्चेला उधाण आले होते. याच अनुषंगाने दोन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे नेतृत्व मानणाऱ्या नगरसेवकांची बैठक घेत मते जाणून घेतली होती.
या बैठकीत देखील उदयनराजेंसमोर मोठ्या प्रमाणात खदखद समोर आली होती. याच अनुषंगाने रविवारी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैठक घेत नगरसेवक, पदाधिकारी तसेच इतरांची मते जाणून घेत वादामागील नेमक्या मुद्द्यांची माहिती करून घेतली. यानंतर त्यांनी नगरसेवकांचे कान टोचत त्यांना सभागृहात शिस्त बाळगण्यासह सर्वांचा आदर राखण्याचा सल्ला देत झालेला प्रकार चुकीचा असल्याचे सांगितले.
याचवेळी त्यांनी सर्व नगरसेवक भाजपाच्या चिन्हावर निवडून आले असल्याने आघाडी किंवा इतर भेद बाळगणे चुकीचे असल्याचे स्पष्ट केले. यापुढील काळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे स्पष्ट करत शहरातील विकासकामांवर भर देण्याचे तसेच टेंडर मिळवण्यासाठी झटणाऱ्या नगरसेवकांचाही समाचार घेतला. बैठकीत नगरसेवकांनी प्रशासन सहकार्य करत नसल्याचा उपस्थित केलेल्या मुद्द्यावर लवकरच तशा सूचना देत प्रशासनासमवेत बैठक घेण्याचेही जाहीर केले.
Raj Thackeray: राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख सदावर्तेंना भोवला; “जरा जपून फिरा” म्हणत राजू पाटलांचा इशारा, रवींद्र चव्हाणांनाही टोला.. निवडून आणले, तसे पाडूही शकतो...आम्ही तुम्हाला निवडून आणले आहे, तसे पाडूही शकतो, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. निधी आम्ही आणत असतो. एकदा जाऊन बघा मिळतो का निधी, अशा शब्दात शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरसेवकांना खडेबोल सुनावले. निधी आणल्यानंतर त्यातून करायची कामे दर्जेदार झाली पाहिजेत. कंत्राटी कामगारांना किमान वेतन न देता त्यांचे आर्थिक शोषण करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी नगरसेवकांचे कान टोचले.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.