परभणी-हिंगोली : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून (Pune Vidhanparshad Election) शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवारी विप्लव बाजोरिया यांना जवळपास निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यासंदर्भात आज किंवा उद्या अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात काल मुंबईत पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी बाजोरिया यांना कामाला लागायच्या सूचना दिल्या आहेत. नंतर बाजोरिया यांनी महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. काल (मंगळवारी) विप्लव बाजोरिया यांनी आपले वडील आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतलीय. मूळचे अकोल्याचे असलेल्या  विप्लव बाजोरिया यांनी याआधीही या मतदारसंघाचे नेतृत्व केलं आहे.(Pune Vidhanparshad Election)


दरम्यान, विप्लव बाजोरिया यांचे वडील आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी स्वतःसाठी भाजपच्या ताब्यात असलेल्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा केला आहे. यासाठी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे जोरदार फील्डिंग लावली आहे. या मतदारसंघात आपल्याला काँग्रेस नगरसेवकांचाही मोठा पाठिंबा मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. गोपीकिशन बाजोरिया यांनी याआधी अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे सलग तीनदा प्रतिनिधित्व केलं आहे. 2022 मध्ये त्यांचा या मतदारसंघात भाजपचे वसंत खंडेलवाल यांनी पराभव केला होता. गेल्यावेळी गोपीकिशन आणि विप्लव बाजोरिया हे दोन्ही पिता-पुत्र एकाच वेळी विधान परिषदेत होते.(Pune Vidhanparshad Election) 


Pune Vidhanparshad Election: पुण्यात राष्ट्रवादी अन् भाजपमध्ये रस्सीखेच


महायुतीत पुणे विधानपरिषदेची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाचं मिळावी. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या या जागेवर राष्ट्रवादीचे अनिल भोसले निवडून आले होते. त्यामुळं या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क आहे, असं म्हणत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे विधानपरिषदेच्या जागेवर दावा ठोकला आहे. पुणे जिल्ह्यात भाजपपेक्षा राष्ट्रवादीची मोठी असल्याचा दाखला पदाधिकारी आणि कार्यकर्ते देतायेत. तसेच आजवर कधीचं उमेदवारी न मिळाल्यानं यंदा पिंपरी चिंचवडमध्ये उमेदवारी द्यावी, अशी ही मागणी समर्थकांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे केली आहे.


 माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, नाना काटे, अजित गव्हाणे आणि भाऊसाहेब भोईर हे इच्छुक आहेत. यापैकी एकाला संधी देण्याचा आग्रह धरण्यात आला आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे 348 मतं तर भाजपची 319 मतं आहेत, शिंदे शिवसेनेच्या 68 मतांची ही साथ भेटणार असल्यानं फूट न पडल्यास महायुतीचा उमेदवार निवडून येणार हे उघड आहे. त्यामुळंचं उमेदवारी मिळवण्यासाठी भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. 


विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत पुण्याच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमधे रस्सीखेच पहायला मिळू शकते. पुण्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधे निवडून आलेल्या प्रतिनिधींच बलाबल पाहता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ३४४ तर भाजपकडे ३०६ इतके प्रतिनिधी आहेत. मयायुतीतील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे ६८ , कॉंग्रेसकडे १९ , शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे १७ तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे ११ सदस्य आहेत. त्यामुळे सर्वात जास्त सदस्य असल्याने राष्ट्रवादीने या जागेवर दावा केलाय. मात्र त्याला भाजप काय निर्णय घेणार हे पहाव लागणार आहे.


 

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.