Nana Patekar On Natsamrat Marathi Play: नागपूरमध्ये (Nagpur News) जलक्रांती परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), नाना पाटेकर (Nana Patekar), मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांच्यासह पाणीसंवर्धनावर काम करणाऱ्या जगभरातील दिग्गजांनी या परिषदेला उपस्थिती लावली. राजकारणात एक रुपयाचं काम आणि दहा रुपयांची प्रसिद्धी असा नियम आहे, असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं तर जेवढी समस्या मोठी तेवढी काम करणाऱ्यांची संख्या कमी असते, असंही कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले. पण, या परिषदेत सर्वांना थक्क केलं ते नाना पाटेकर यांच्या भाषणानं. नाना पाटेकरांनी कार्यक्रमात आपल्या अभिनय प्रवासाचा आणि 'नटसम्राट' सिनेमाचा (Natsamrat Movie) उल्लेख केला. तसेच, 'नटसम्राट' नाटक न करता, सिनेमाच का केला? यावरही भाष्य केलं आहे. 


ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर नेमकं काय म्हणाले? (Nana Patekar On Natsamrat Marathi Play)


नाम फाऊंडेशनच्या कामाचं कौतुक करत असतानाच नानांनी आपल्या अभिनय प्रवासाचा आणि 'नटसम्राट' सिनेमाचा उल्लेख केला. नाना पाटेकर म्हणाले की, "एखादी भूमिका जिवंत करण्यासाठी त्यात पूर्ण जीव ओतावा लागतो... 'नटसम्राट' या नाटकामध्ये अप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका साकारणं ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत थकवणारी आणि आव्हानात्मक बाब आहे..."


"'नटसम्राट'वेळी मला विचारलं तेव्हा मी सांगितलं की, मी नाटक नाही करणार, सिनेमा करेन... नाटक करत असताना तो प्रत्येकवेळी जीव त्यात ओतायचा. मला वाटतं की, 10, 15 किंवा 25 प्रयोगांनंतर मी मेलो असतो... डॉ. लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले, यशवंत दत्त या सगळ्यांनीच नटसम्राट केलं... ज्यांनी ज्यांनी नाटक केलं , ते सगळे हॉर्ट अटॅकनं गेले... नाटकाच्या प्रत्येक प्रयोगात जीव ओतल्याशिवाय प्रेक्षकांना तो आनंद देताच येणार नाही...", असं नाना पाटेकर म्हणाले.


पुढे बोलताना अभिनेते नाना पाटेकर म्हणाले आहेत की, "डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले यांसारख्या दिग्गजांनी हे नाटक केलं आणि प्रत्येक प्रयोगात आपला जीव ओतला. या भूमिकेची तीव्रता एवढी प्रचंड आहे की, कलाकाराच्या हृदयावर त्याचा मोठा ताण येतो. म्हणूनच मी हे नाटक करायला स्पष्ट नकार दिला होता आणि पुढं जाऊन नाटक न करता फक्त सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला..."


"तर सिनेमात सह-अभिनेता राहिलेले दिवंगत अभिनेते विक्रम गोखले हे अभिनयाच्या बाबतीत माझ्यापेक्षा कैक पटीनं सरस होते आणि त्यांच्या अभिनयाची उंची गाठणं कोणालाही शक्य नाही...", असंही नाना पाटेकर यांनी म्हटलंय.


"मी नटसम्राट सिनेमा करत असताना रेफरन्स होता... डॉ. लागू, दत्ता भट्ट... त्यामुळे आम्ही केलेलंय ते एवढुसं आहे... तुम्ही त्यांनी केलेलं ओरिजनल दुर्दैवानं पाहिलं नाही, काही मंडळींना बघायला मिळालं असेल... काय काम करायचे बापरे... 'पुरूष' करत असताना मध्यांतरामध्ये पडदा बंद झाल्यानंतर एकाही खुर्चीचा आवाज यायचा नाही... त्याचा इम्पॅक्ट इतका असायचा... लोकांना ते सुन्न करायचं... तो जो आनंद मिळायचा ना... अत्युच्च आनंद आहे, नट म्हणून... हाच आनंद 'नाम'चं काम करताना मिळतो...", असंही नाना पाटेकर म्हणालेत. 


पाहा व्हिडीओ : Nana Patekar Speech Nagpur : महाराष्ट्र सोडून गावखेड्यात जाण्याचा विचार, नानांचं गडकरींसमोर भाषण!




Pune Club: अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या क्लबमध्ये तरूण-तरूणींचे अश्लील चाळे; गर्दीने भरलेल्या ठिकाणी नको ते कृत्य, व्हिडीओ व्हायरल, पुण्यातील पब संस्कृती पुन्हा वादात

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.