बॉलिवूडचे महानायक आणि चाहत्यांचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मोठी अपडेट समोर येत आहे. अमिताभ बच्चन यांनी मुंबई येथील नानावटी रुग्णलयात दाखल करण्यात आलं आहे. बिग बी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं समजताच चाहत्यांनी चिंता व्यक्त करण्यात सुरुवात केली आहे… पण काळजी करण्याचं काहीही कारण नाही. कारण रुग्णालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अमिताभ बच्चन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे.
अमिताभ बच्चन यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, चाहत्यांसाठी बिग बी फक्त दिग्गज अभिनेते नाहीत तर, एक भावना आहे. लहान मुलांपासून वृद्ध व्यक्ती देखील अमिताभ बच्चन यांचे चाहते आहे. याच कारणामुळे चाहते अमिताभ बच्चन यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. अशात बिग बी देखील चाहत्यांना नाराज करत नाहीत.
अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियावर सक्रिय असतात. ते कायम X अकाउंटवर पोस्ट शेअर करतात आणि चाहत्यांच्या संपर्कात राहतात… चाहते देखील त्यांच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात. बिग बी अनेकदा अशा पोस्ट करतात ज्या, लोकांना गोंधळात टाकतात. चाहत्यांनी कळत नाही की, बिग बींना नक्की काय म्हणायचं आहे. 18 मे रोजी त्यांनी X वर पोस्ट केलं , “जेव्हा दोघे लढतात, तेव्हा तिसरा जिंकतो.”
घरातून बाहेर येत चाहत्यांना भेटतात…अमिताभ बच्चन सोशल मीडियावर सक्रिय तर कायम असतात, पण चाहत्यांना भेटण्यासाठी ते कायम घराबाहेर येऊन काही काळ चाहत्यांसोबत घालवतात… जवळपास प्रत्येक रविवारी अमिताभ बच्चन जलसा बंगल्या बाहेर येतात आणि चाहत्यांना अभिवादन करतात. बिग बींची एक झलक पाहण्यासाठी देखील चाहते उत्सुक असतात.
अमिताभ बच्चन यांच्या फिल्मी करियरबद्दल सांगायचं झालं तर, बिग बींनी असंख्य चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सात हिंदुस्तानी’ सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत त्यांनी 200 पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम केलं आहे. आज वयाच्या 83 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन मोठ्या पडद्यावर सक्रिय आहेत आणि चाहते त्यांच्या नव्या सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.