सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या कुणबी दाखल्याबाबत तक्रार करण्याचा अधिकार संतोष साळुंखे व जयदीप मगर यांना नसून ही तक्रार रद्द करावी, याबाबत डॉ. प्रिया शिंदे यांच्या वकिलांनी केलेला अर्ज जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे यांनी निकाली काढला. आता पुढील सुनावणीत कुणबी दाखल्याबाबत तक्रारदारांनी दाखल केलेल्या पुराव्यांची पडताळणी होणार आहे.

farmer Success Story: पहिल्याच वर्षी 20 टन केशर आंब्याचे उत्पादन; मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या शेतात बहरली आंबराई!

डॉ. प्रिया शिंदे यांनी कुटुंबाची खोटी वंशावळ, खोटी कागदपत्रे, रहिवासाचे मूळ ठिकाण लपवून, तहसीलदार, प्रांताधिकाऱ्यांशी संगनमत करून कुणबी खोटे प्रमाणपत्र काढले असून, हे प्रमाणपत्र रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे जयदीपकुमार मगर व संतोष साळुंखे यांनी केली होती. याबाबत जीवन गलांडे यांच्यासमोर सुनावणी झाली.


या युक्तिवादात ॲड. पिसाळ व पाटील यांनी प्रिया शिंदे यांच्या निवडीने साळुंखे व मगर यांचे कोणतेही राजकीय नुकसान झाले असल्याने त्यांना तक्रार करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले. त्यामुळे ही तक्रार रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली.


त्यानंतर युक्तिवाद करताना साळुंखे व मगर यांचे वकील ॲड. दत्तात्रय घोडके म्हणाले, ‘‘तक्रारदार हे जिल्ह्यातील मतदार असल्याने त्यांना चुकीच्या दाखल्याबाबत तक्रार करण्याचा अधिकार आहे. जात पडताळणी कलम १९ नुसार कोणीही तक्रार करू शकते.


त्यामुळे तक्रार रद्द करणे योग्य होणार नाही. तक्रारदारांच्या अधिकारांवर गदा आणण्यापेक्षा त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांची पडताळणी करावी.’’ या युक्तिवादानंतर जीवन गलांडे यांनी तक्रार रद्द करण्याबाबतचा अर्ज निकाली काढत पुढील सुनावणीवेळी पुराव्यांची पडताळणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Raj Thackeray: राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख सदावर्तेंना भोवला; “जरा जपून फिरा” म्हणत राजू पाटलांचा इशारा, रवींद्र चव्हाणांनाही टोला.. सदस्य अपात्रतेप्रकरणी शुक्रवारी सुनावणी

सातारा : जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून निवडून आलेल्या तीन सदस्यांच्या अपात्रतेप्रकरणी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाली. पुढील सुनावणी शुक्रवारी (ता. २२) होणार आहे.


जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडताना राष्ट्रवादीचे सदस्य असलेल्या कामेश कांबळे व लता कर्णे या दोन


सदस्यांनी पक्षादेश न पाळता भाजपच्या उमेदवारांना मतदान केले, तसेच ऋतुजा शिंदे यांनी सभापती निवडीवेळी पक्षादेश पाळला नाही.


त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात यावे, अशी याचिका जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते उदय कबुले यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे.


जिल्हाधिकाऱ्यांसमोर मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी कामेश कांबळे आणि लता कर्णे यांनी आपले म्हणणे मांडले, तर ऋतुजा शिंदे यांनी म्हणणे मांडण्यासाठी ४ दिवसांची मुदत मागितली.


यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.