Marathi Rashi Bhavishya : ज्योतिषशास्त्रानुसार आज अत्यंत प्रभावशाली योग दिसणार आहे. आज 20 मे रोजी मिथुन राशीमध्ये गुरु आणि शुक्र यांची युती होणार असून गजलक्ष्मी राजयोग तयार होणार आहे. तर मिथुन राशीतच असलेल्या चंद्र आणि गुरूच्या युतीने गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. तर चंद्र आणि शुक्र यांच्या युतीमुळे कालक्षी योग तयार होणार आहे. या विशेष युतीमुळे चार राशींचा सुवर्णकाळ सुरु होणार असून फक्त धन आणि प्रॉपर्टीच नाही तर त्यांची प्रगतीही होणार आहे. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊया.


मेष रास :


या तीन ग्रहांच्या युतीमुळे मेष राशीच्या प्रगतीचे मार्ग खुले होणार आहेत. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना प्रोमोशन मिळेल. तुमचे वरिष्ठ तुमचं कौतुक करतील. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या एखादी मोठी डील मिळेल ज्याचा भविष्यात फायदा होईल. गुरूच्या आशीर्वादाने वडिलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल.


कर्क रास :


ही ग्रहस्थिती तुम्हाला दिलासा देणारी ठरणार आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. अडकलेले पैसे परत मिळतील. तुम्ही तणावमुक्त असाल. मानसिक ताण दूर होईल. तुम्ही अधिक उत्साही आणि सकारात्मक असाल. जोडीदारासोबतचे संबंध सुधारतील. अविवाहितांचे विवाह ठरू शकतात.


सिंह रास :


सिंह राशीच्या लोकांना हा काळ वरदान ठरेल. तुमच्या नशिबात वाढ होईल. नियोजित प्रकल्प पूर्ण होतील. रखडलेली काम कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होतील. वाहन आणि मालमत्तेचे लाभ मिळतील. प्रेमजीवन सुखी राहील. चैनीच्या वस्तूंवर पैसे खर्च कराल. शिक्षण किंवा रोजगारासाठी परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होईल.


वृश्चिक रास :


आर्थिकदृष्ट्या हा काळ मजबूत आहे. तुमचा आदर आणि मानसन्मान वाढेल. सामाजिक वर्तुळात लोकप्रियता वाढेल. जुन्या दीर्घकालीन आजारातून सुटका होईल. शेअर बाजार किंवा जुन्या गुंतवणुकीचा लाभ होईल.


डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.