पुणे: विषुववृत्तीय प्रशांत महासागरात मे ते जुलैदरम्यान ‘एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यता असून, याचा थेट परिणाम यंदाच्या मॉन्सूनवर होऊ शकतो. मॉन्सूनचे आगमन होत असतानाच ‘एल निनो’ सक्रिय होणार असल्याने यंदा पर्जन्यमान घटण्याची आणि पावसाचे वितरण बिघडण्याची दाट शक्यता आहे. परिणामी, राज्याच्या कृषी क्षेत्राला मोठा फटका बसू शकतो, अशी भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

farmer Success Story: पहिल्याच वर्षी 20 टन केशर आंब्याचे उत्पादन; मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या शेतात बहरली आंबराई!

अमेरिकेच्या ‘नॅशनल ओशनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन’ (नोआ) या हवामान संस्थेच्या ‘क्लायमेट प्रेडिक्शन सेंटर’ने (सीपीसी) जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, जूनमध्ये एल निनो सक्रिय होण्याची शक्यता तब्बल ८२ टक्के आहे. सध्या महासागरातील ‘निनो ३.४’ निर्देशांकाचे मूल्य ०.६८ अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, हवामान अंदाजानुसार त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या ‘क्षीण एल निनो’ स्थिती निर्माण झाली आहे. डिसेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ दरम्यान ही स्थिती कायम राहण्याची शक्यता ९६ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. जून-जुलैमध्ये क्षीण, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मध्यम, तर ऑक्टोबरनंतर तीव्र किंवा अतितीव्र ‘एल निनो’ निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे.


याविषयी भारतीय हवामानशास्त्र विभाग पुण्याचे माजीप्रमुख कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, ‘‘एल निनो सक्रिय झाला म्हणजे पाऊस पडणारच नाही असे नाही, तर त्याचे नैसर्गिक चक्र आणि वितरण बिघडते. या काळात काही ठिकाणी मुसळधार पाऊस, तर काही भागात अत्यंत कोरडी स्थिती असे चित्र पाहायला मिळते. इतिहासातील नोंदी पाहिल्यास, २०१५ च्या एल निनो वर्षात देशात ८६ टक्के, तर २००२ मध्ये अवघा ८० टक्के पाऊस पडला होता. अगदी अलीकडचे २०२३ चे उदाहरण पाहिल्यास, त्यावेळी एकूण ९४ टक्के पाऊस झाला तरी जून आणि ऑगस्ट पूर्णपणे कोरडे गेले होते. यंदाही अशाच प्रकारच्या अनियमित मॉन्सूनचे सावट राहू शकते, ज्याचा मोठा फटका राज्याच्या कृषी क्षेत्राला बसू शकतो.’’


एल-निनोच्या काळात मॉन्सूनमध्ये मोठा खंड पडण्याची दाट शक्यता असते. केवळ एकूण पावसाच्या आकडेवारीवर अवलंबून न राहता, पडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे नियोजन करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी शेततळी आणि जलसंधारणाच्या माध्यमातून पाणी साठविण्यावर भर द्यावा, तसेच एल निनोच्या प्रभावामुळे आगामी हिवाळा आणि २०२७ चा उन्हाळा अधिक उष्ण राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.


- कृष्णानंद होसाळीकर, माजी प्रमुख, हवामानशास्त्र विभाग, पुणे

Raj Thackeray: राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख सदावर्तेंना भोवला; “जरा जपून फिरा” म्हणत राजू पाटलांचा इशारा, रवींद्र चव्हाणांनाही टोला.. हिवाळा, उन्हाळ्यावरही परिणाम

‘एल निनो’चा परिणाम केवळ पावसापुरता मर्यादित राहत नाही. ‘एल निनो’ची वर्षे बहुतांश वेळा ‘उष्ण वर्षे’ म्हणून ओळखली जातात. आगामी हिवाळा तीव्र एल निनोच्या प्रभावाखाली राहणार असल्याने यंदाचा ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानचा काळ कमी थंडीचा किंवा अधिक उष्ण राहू शकतो, तसेच आगामी २०२७ चा उन्हाळाही अधिक तीव्र आणि उष्ण असण्याची शक्यता आहे.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.