उन्हाळा असो की पावसाळा अथवा हिवाळा ताक पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे असे तज्त्र सांगतात. कारण ताकात प्रोबायोटिक, कॅल्शियम,पोटॅशियम,मॅग्नेशियम यासह इतर व्हिटामीन्स असतात. तसेच ताक थंड असल्याने शरीराला थंडावाही मिळतो. ताक पिल्याने पचनशक्ती सुधारते अन्न लवकर पचते. यामुळे विशेष करून उन्हाळ्याच्या दिवसात ताक पिण्यास प्राधान्य दिले जाते.
वजन कमी करण्यासाठीही ताक पिणे उपयुक्त ठरते. ताकात फॅट्स कमी आणि पोषण तत्व अधिक असतात. त्यामुळे डाएटमध्येही ताकाचा समावेश केला जातो. त्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते. त्यामुळे सतत भूक लागत नाही. खाण्यावर कंट्रोल येतो.
ताकामुळे शरीर हायड्रेट राहते. लिव्हर, गट हेल्थ चांगली राहते. शऱीरातील टॉक्सिस्न बाहेर टाकले जातात.
हे जरी ताक पिण्याचे फायदे असले तरी काहीजणांना ताक पिल्यानंतर त्रास होतो. यामुळे अशा व्यक्तींनी ताक पिऊ नये.
सर्दी-खोकला
जर तुम्हाला सतत सर्दी खोकल्याचा त्रास होत असेल. गळा बसत असेल तर अशा व्यक्तींनी ताक वर्ज्य करावे.
ताप
ताप आलेल्या व्यक्तींनी ताक पिऊ नये. ताक थंड असते त्यामुळे तापात ताक पिणे टाळावे.
सांधेदुखी
ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे.हातापायांना सूज येत असेल तर ताक पिऊ नये. कारण ताक आंबट असते त्यामुळे शरीरात आम्ल वाढते. सांधेदुखी वाढू शकते.
मुतखडा
ज्यांना मुतखड्याचा त्रास असेल त्यांनी ताक पिऊ नये. त्यातही जर ऑक्सालेट स्टोन असेल तर ताक पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.