बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






भटक्या कुत्र्यांनी चावल्यामुळे एका २२ वर्षाrय तरुणास जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भयंकर प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि नागरिकांनी थेट मृतदेह महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पायNयांवर आणून ठेवत मनपा प्रशासनाविरुद्ध तीव्र आक्रोश आणि रोष व्यक्त केला. तब्बल २ ते ३ तास चाललेल्या या थरारानंतर मनपाने लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.


मिळालेल्या माहितीनुसार, लातूर मनपा हद्दीतील भुई गल्ली परिसरातील रहिवासी विलास उत्तम गोरवे हा तरुण १८ मे रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला होता. याच वेळी चार ते पाच हिंस्त्र भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक जीवघेणा हल्ला चढवला. कुत्र्यांनी विलासच्या हातावर, पायावर आणि थेट मानेवर गंभीर लचके तोडले. या हल्ल्यात विलास रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला तात्काळ ‘विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत’ उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मृत्यूशी झुंज अपयशी ठरून २० मे रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तो मरण पावला.


संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह थेट महानगर पालिकेच्या दारात आणून ठेवला.अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत नातेवाईकांशी चर्चा केली. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतरच नातेवाईकांनी मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात घेतला. दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई केली जाईल. पीडित गोरवे कुटुंबाला महानगरपालिकेकडून तात्काळ आर्थिक सहाय्य दिले जाईल असे अश्वासन देण्यात आले.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.