छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके याची आई आणि वडिलांसोबत एबीपी माझानं संवाद साधला. यावेळी अभिजीत दीपके याची आई  अनिता दीपके आणि वडील भगवान दीपके यांनी अभिजीतचे फॉलोअर वाढले असले तरी आम्हाला चिंता आहे. त्यांनं राजकारणात जाऊ नये.. चळवळ आता थांबवावी, असं म्हटलंय. अभिजीतच्या प्रसिद्धीच्या चिंतेने आई देखील दोन दिवस झोपली नाही, असं अनिता दीपके यांनी म्हटलं.


अनिता दीपके काय म्हणाल्या?


अभिजीत लहानपणापासून शांत होता. त्याचं दहावीपर्यंतचं शिक्षण अल्फान्सो स्कूल झालं त्यानंतर अकरावी बारावी एसबी कॉलेजला झालं. पुण्यात त्यानं मास मीडियाचं शिक्षण घेतल्याचं अनिता दीपके यांनी म्हटलं. भगवान दीपके यांनी पत्रकारितेत एमएस करायचं असल्यानं अभिजीत परदेशात गेल्याचं म्हटलं. आमच्या मुलानं पार्टी उभी केल्याचं 17 मे रोजी समजल्याचं भगवान दीपके म्हणाले.


कॉकरोच जनता पार्टी ऐकल्यानंतर झुरळ झुरळ काय चाललंय, असं अभिजीतला विचारल्याचं अनिता दीपके यांनी म्हटलं. माझ्या नातवानं भाजपपेक्षा जास्त फॉलोअर्स झाल्याचं सांगितल्याचं अनिता दीपके यांनी म्हटलं.


भगवान दीपके काय म्हणाले?


राजकारण आमचा पिंड नाहीये, माझी इच्छा होती की त्यानं क्लासवन ऑफिसर व्हावं. आम्ही राजकारणात पडलो नाही आणि आम्हाला त्याची आवड नाही, असं भगवान दीपके यांनी म्हटलं.


अभिजीत दीपके यानं दोन तीन वर्षं काम केलं होतं, मीडियाचं शिक्षण घेतल्यानं त्याला केजरीवाल साहेबांनी बोलावून घेतलं होतं. तो गेलेला होता. तेव्हा आपण काही राजकारणी लोक नाही, आपण सर्व्हिस केलेली चागंली असते, असं सांगितल्याचं अनिता दीपके यांनी म्हटलं.


प्रसिद्धीमुळं भीती वाटते, दुसरं काही नाही. उचलून नेतात, अटक करतात, आपल्याला याची काय सवय नाही. आपल्या मुलाला अटक करतील का असं वाटते, असं अनिता दीपके म्हणाले. सरकार कधी काय करु शकेल काही सांगता येत नाही, त्यामुळं भीती वाटते, असं अनिता दीपके म्हणाल्या. अभिजीत दीपके नंतर फोन करतो, सविस्तर बोलतो, असं म्हटल्याचं अनिता दीपके यांनी म्हटलं.


सध्याचं राजकारण पाहिलं तर भीती वाटणं साहजिक आहे. त्याचे फॉलोअर असले तरी वाटणं साहजिक आहे, असं भगवान दीपके म्हणाले.  अभिजीत दीपकेनं एका मीडियावर बोलताना म्हटलं की भारतात गेलं की तुरुंगात टाकतील असं म्हटल्याचं भगवान दीपकेंनी म्हटलं. संजय राऊत, संजय सिंग यांना आत टाकलं होतं, कोर्टानं त्यांना निर्दोष सोडलं पण पेपर पाहून भीती वाटते, असं भगवान दीपके यांनी म्हटलं.  इकडं यायचं असेल तर सुखरुप ये असं सांगेन असं भगवान दीपके म्हणाले. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असंही भगवान दीपकेंनी म्हटलं.


अभिजीत प्रामाणिक आहे, आता त्यानं काय करावं त्याच्या मनावर आहे. अभिजीतनं राजकारणात जाऊ नये अशी आमची इच्छा आहे, असं भगवान दीपके म्हणाले. अभिजीत जे करतोय ते त्यानं थांबवावं, असं अनिता दीपके म्हणाल्या.





हेदेखील वाचा




आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.