Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या अस्वस्थता आणि धूसफूस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. पक्षाचे नेते जाहीरपणे सर्व काही आलबेल असल्याचं सांगत असले तरी गेल्या काही दिवसातल्या घडामोडींमुळे पक्षनेतृत्वासमोर अनेक आव्हानं उभी राहिलीयत. पक्षातील नाराजी असो किंवा नेत्यांना टिकवून ठेवण्याचा प्रश्न असो, एकाच वेळी अनेक आव्हानांचा सामना पक्षाला करावा लागतोय.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरु आहे, असा प्रश्न सध्या अनेकांना पडलाय.हा प्रश्न पडण्यासाठी कारणीभूत आहेत एकामागून एक घडणाऱ्या घटना आणि नेत्यांकडून केली जाणारी वक्तव्यं.अजितदादांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सुनेत्रा पवारांनी आपल्या खांद्यावर घेतली. मात्र राष्ट्रवादीतल्या नेत्यांसमोर अजूनही लीडरशिप क्रायसिस आहे, असं सत्तेतला मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेला वाटतंय. आणि हे केवळ त्यांचं निरीक्षण नाहीय, तर राष्ट्रवादीचे काही नेते शिवसेनेच्या संपर्कातही असल्याचा दावा संजय शिरसाटांनी केलाय. बघूया, याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.