NEET Paper Leak Case : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET-UG 2026) पेपर लीक प्रकरणावर आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) प्रमुखांनी मोठी माहिती दिली आहे. नीटचा संपूर्ण पेपर लीक झाला नव्हता, तर केवळ काही प्रश्न बाहेर आले, असा दावा एनटीएच्या महासंचालकांनी (DG) संसदीय संयुक्त समितीच्या बैठकीत केल्याची माहिती सूत्रांनी सांगितली. या घटनेनंतर परीक्षा रद्द करण्यात आली असून सध्या या प्रकरणाचा तपास सीबीआय (CBI) करत आहे.


सध्याच्या घडीला 21 जून 2026 रोजी होणारी नीटची फेरपरीक्षा (NEET Re-Exam) कोणत्याही त्रुटींशिवाय आणि सुरक्षित वातावरणात पार पाडणे ही एनटीएची पहिली प्राथमिकता असल्याचं महासंचालकांनी स्पष्ट केलं आहे.


CBI Investigation NEET : संपूर्ण चित्र सीबीआयच्या तपासानंतरच स्पष्ट होणार


शिक्षण मंत्रालयाच्या संदर्भातील संसदेच्या संयुक्त समितीसमोर एनटीएच्या महासंचालकांनी आपली बाजू मांडली. जेव्हा त्यांना पेपर लीकबाबत विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी संपूर्ण पेपर लीक झाल्याचा नकार दिला. ते म्हणाले, "पेपर लीक झाला नव्हता, तर काही प्रश्न लीक झाल्याची माहिती समोर आली होती. आता हा तपास सीबीआय करत असल्यामुळे नेमके किती प्रश्न लीक झाले, हे एनटीए सांगू शकत नाही. सीबीआयचा तपास पूर्ण झाल्यावरच संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत."


NEET Re Exam Date : 21 जूनच्या फेरपरीक्षेसाठी नवीन प्रश्नपत्रिका


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी अत्यंत गोपनीय पद्धतीने नवीन प्रश्नपत्रिका (New Question Paper) तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संसदेच्या समितीसमोर अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आणि तपास यंत्रणेकडे असल्याने त्यांच्याकडे अधिक तपशील देण्यासारखा नाही. मात्र, एकदा 21 जून रोजी परीक्षा पार पडली की, नवीन शैक्षणिक सत्राला (New Academic Session) उशीर होणार नाही, याची पूर्ण काळजी सरकार आणि एनटीएकडून घेतली जाईल.


Future Exam Guidelines : भविष्यातील परीक्षेच्या रचनेत होणार मोठे बदल


गुरुवारी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चाललेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत शिक्षण मंत्रालयाचे उच्चपदस्थ अधिकारीही उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एकदा 21 जूनची परीक्षा यशस्वीरित्या पार पडली की, पुढील वर्षापासून (2027) नीट परीक्षेच्या संपूर्ण रचनेत आणि सुरक्षेत मोठे बदल करण्याबाबत सविस्तर चर्चा केली जाईल. भविष्यात अशा पेपर लीकच्या किंवा गैरप्रकारांच्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी एक फुलप्रूफ प्लॅन तयार केला जात आहे.


NEET Exam Extra Time : विद्यार्थ्यांना मिळणार 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ


नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) स्पष्ट केलं आहे की, NEET UG 2026 ची फेरपरीक्षा 21 जून 2026 रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी 5.20 या वेळेत घेतली जाईल. विशेष म्हणजे, या वेळी विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ (Extra Time) दिला जाणार आहे. हा अतिरिक्त वेळ परीक्षा केंद्रावरील बायोमेट्रिक तपासणी, स्वाक्षरी आणि फोटो पडताळणी यांसारख्या आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल, जेणेकरून विद्यार्थ्यांचा मूळ परीक्षेचा वेळ वाया जाणार नाही.


ही बातमी वाचा:


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.