नाशिक क्राईम न्यूज : नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. शेतीच्या वादातून दोन महिलांना ट्रॅक्टरखाली चिरडल्याची घटना घडली आहे. वादग्रस्त जमिनीवर नांगरणी सुरू असताना ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असताना शेतात दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलांना ट्रॅक्टरची धडक बसल्याचा आरोप करण्यात येत आहे.


पिंपळगाव बसवंत पोलिसांत गुन्हा दाखल


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, रश्मी अजय गोसावी आणि सुवर्णा सुभाष गोसावी या जखमी झाल्या आहेत. त्यांच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधितांच्या विरोधात पिंपळगाव बसवंत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.


भावबंदकीच्या जमीन वादातून धक्कादायक घटना समोर


नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसंत परिसरात भावबंदकीच्या जमीन वादातून धक्कादायक घटना समोर आली आहे. न्यायालयाने स्थगिती दिलेल्या जमिनीवर जबरदस्तीने शेती नांगरण्याचा प्रयत्न करत महिलांसह कुटुंबीयांना ट्रॅक्टरखाली चिरडून जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेत दोन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, न्यायालयाचा आदेश असतानाही जबरदस्तीने जमिनीत प्रवेश केल्याचा आरोप होत असताना पोलिसांनी सौम्य गुन्हे दाखल केल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे/


महत्वाच्या बातम्या:


तू माझी नाही झाली, तर कोणाचीच होऊ देणार नाही, तरुणीसह तिच्या मित्रावर अॅसिड हल्ला, धक्कादायक घटनेनं पुणे हादरलं




आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.