Beed Crime News : बीड शहर पुन्हा एकदा खळबळजनक हत्याकांडाने हादरले आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बालेपीर परिसरात अवैध दारु दुकानात काम करणाऱ्या एका तरुणाची अमानुषपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. उमेश नवनाथ दळवी असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याच्यावर करण्यात आलेली मारहाण ही सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पद्धतीसारखीच असल्याचा आरोप नातेवाईकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
उमेश दळवीचे मारहाणीतील गंभीर अवस्थेतील फोटो सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी पीडित कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. जोपर्यंत आरोपींवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा कुटुंबीयांनी पोलिसांना दिला आहे. त्यामुळे उमेश दळवीचा मृतदेह सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या हत्येनंतर बीडमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे.
टिटवाळ्याजवळील आंबिवली परिसरातून एक अत्यंत सुन्न करणारी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणाने आपल्या 22 वर्षांच्या प्रेयसीची अत्यंत क्रूरपणे मारहाण करत हत्या केली आहे. रुक्सार अन्सारी असं या दुर्दैवी मृत तरुणीचं नाव असून, सतीश उर्फ गुड्डू वाघे असं हत्या करणाऱ्या नराधम आरोपीचं नाव आहे. चारित्र्यावर संशय घेत आरोपीने रुक्सारला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता घरातला टीव्ही आणि पाण्याने भरलेला तांब्याचा हंडा तिच्या डोक्यात मारून तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. या घटनेनंतर गंभीर जखमी रुक्सारला घेऊन तिचे नातेवाईक आधी टिटवाळा आणि नंतर उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात पळाले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. संतापजनक बाब म्हणजे हत्येनंतर रुग्णालयाबाहेर फिरणाऱ्या या नराधम आरोपीला मुलीच्या नातेवाईकांनी पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. सध्या याप्रकरणी टिटवाळा तालुका पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.