आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) आज 24 मे रोजी डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. या डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने रियान पराग याच्या नेतृत्वात वानखेडे स्टेडियमध्ये मुंबई इंडियन्सवर 30 धावांनी विजय मिळवून प्लेऑफचं तिकीट मिळवलं. राजस्थान यासह प्लेऑफमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. त्यानंतर आता डबल हेडरमधील दुसऱ्या आणि साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. दोन्ही संघांचं साखळी फेरीतून याआधीच आव्हान संपुष्ठात आलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा हा सामना जिंकून मोहिमेचा शेवट विजयाने करण्याचा प्रयत्न असणार आहे. अशात दिल्ली कॅपिट्ल्सने केकेआरसमोर 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दिल्लीने केएल राहुल याने केलेल्या वादळी खेळीच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 203 धावा केल्या. त्यामुळे केकेआर इडन गार्डन्स या घरच्या मैदानात सामना जिंकून 2 गुणांची कमाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दिल्लीचं द्विशतककेकेआर कॅप्टन अजिंक्य रहाणे याने टॉस जिंकून दिल्लीला बॅटिंगसाठी बोलावलं. दिल्लीने या संधीचा फायदा घेऊन द्विशतक केलं. दिल्लीला 200 पार पोहचवण्यात एकूण 6 फलंदाजांनी योगदान दिलं. या 6 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. मात्र केएल राहुल याने दिल्लीसाठी सर्वाधिक धावा केल्या. तसेच इतरांनीही बहुमुल्य योगदान दिलं.
लाईव्ह स्कोअरकार्ड
केएल राहुल याने केकेआर विरुद्ध 200 च्या स्ट्राईक रेटने 30 बॉलमध्ये 60 रन्स केल्या. केएलचं हे 19 व्या हंगामातील पाचवं अर्धशतक ठरलं. केएलने या दरम्यान 4 सिक्स आणि 5 फोर ठोकले. केएल व्यतिरिक्त कॅप्टन अक्षर पटेल याने 39 धावांचं योगदान दिलं. डेव्हिड मिलर याने 28 धावा केल्या. साहिल पारख याने 24 तर अभिषेक पोरेल याने 22 रन्स केल्या. तर आशुतोष शर्मा याने अखेरच्या क्षणी 11 बॉलमध्ये नॉट आऊट 18 रन्स करुन दिल्लीला 200 पार पोहचवण्यात योगदान दिलं. तर केकेआरसाठी सौरभ दुबे याने 2 विकेट्स मिळवल्या. तर अनुकूल रॉय, सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्ती या तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
दिल्ली पराभवाची वसुली करणार?दरम्यान दिल्लीकडे हा सामना जिंकून केकेआर विरुद्ध गेल्या पराभवाची वसुली करण्याची संधी आहे. दोन्ही संघ याआधी 19 व्या हंगामात 8 मे रोजी आमनेसामने आले होते. तेव्हा केकेआरने दिल्लीवर 8 विकेट्सने एकतर्फी विजय मिळवला होता. त्यामुळे आता केकेआर घरच्या सामन्यात विजयी शेवट करणार की दिल्ली हिशोब चुकता करण्यात यशस्वी ठरणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.