NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील आरोपी प्राध्यापिका मनिषा हवालदार हिला दिल्लीतील राऊज अवेन्यू कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टात हजर करताना मनिषाने तिचा चेहरा ढाकलेला होता. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या प्रकरणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर जोरदारी टीका केली आहे. तसेच या प्रकरणी नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर फौजदारी कारवाई व्हायला हवी अशी मागणी केली आहे.
”लाखो विद्यार्थ्यांचे करिअर बरबाद करून नंतर तोंड लपवतायत. अशा निर्लज्ज लोकांना पेपर लिक केल्याप्रकरणी भरचौकात शिक्षा द्यायला हवी. तसंच नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर देखील फौजदारी स्वरुपाची कारवाई व्हायला हवी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
मनीषा हवालदारने प्रश्नांच्या नोट्स जाळल्या
आरोपी मनीषा हवालदार हिने तपास यंत्रणांचा संशय आपल्यावर येऊ नये, यासाठी पुरावे नष्ट करण्याचे नियोजनबद्ध प्रयत्न केल्याचे समोर आले असून, तिने प्रश्नांच्या नोट्स जाळल्या. तर, याअनुषंगाने केलेले मेसेज डिलीट केले आहेत. मनीषा हवालदार यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनंतर एनटीएच्या पॅनेलवरील या प्राध्यापिकेच्या भूमिकेबाबत संशय गडद झाला असून, तपास यंत्रणांनी तिच्या हालचाली आणि संपका&ंची पडताळणी सुरू केली आहे.