आयपीएल 2026 अर्थात 19व्या पर्वातही दिल्ली कॅपिटल्सच्या पदरी निराशा पडली. यंदाच्या पर्वात अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्स चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र यंदाही स्वप्नच राहिलं. दिल्ली कॅपिटल्सने 14 पैकी सात सामन्यात विजय मिळवला आणि 14 गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर राहिला. शेवटच्या तीन सामन्यात सलग विजय मिळवूनही प्लेऑफचं गणित सोडवता आलं नाही. असं असताना दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापन पुढच्या पर्वाच्या तयारीला लागल्याची चर्चा आहे. पुढच्या मिनी लिलावासाठी 34.50 कोटींची तरतूद करण्याची रणनिती आखणार असल्याचं बोललं जात आहे. यासाठी पाच खेळाडूंना रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या पर्वात पॉकेटमध्ये चांगले पैसे असतील आणि नवीन खेळाडूंची खरेदी करता येईल. चला जाणून घेऊयात दिल्ली कॅपिटल्स कोणत्या खेळाडूंना रिलीज करू शकते ते…

कुलदीप यादवला रिलीज करणार!

दिल्ली कॅपिटल्सचा फिरकीपटू कुलदीप यादवचं नाव वाचून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला असेल. कारण कुलदीप यादव हा मॅच विनर खेळाडू आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सला मागच्या काही वर्षात विजय मिळवून दिला आहे. पण या पर्वात त्याची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्याने 11 डावात फक्त 10 विकेट घेतले. पण 10.30 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या. त्यामुळे त्याला संघातून रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. त्याला रिलीज केलं तर पर्समध्ये 13.25 कोटींची रक्कम जमा होईल.

नटराजन आणि मुकेश कुमारला डच्चू!

दिल्ली कॅपिटल्ससाठी गोलंदाजी ही सर्वात कमकुवत बाजू ठरली. डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजन याला 10.75 कोटी दिले. पण त्याची कामगिरी काही खास राहिली नाही. त्याने 10 डावात फक्त 5 विकेट घेतल्या. तर इकोनॉमी रेटही 11.18 इतक होता. तर मुकेश कुमारही खास करू शकला नाही. त्याने 10 डावात फक्त 6 विकेट घेतले. दिल्ली कॅपिटल्सने त्याच्यासाठी 8 कोटी मोजले होते. या दोघांना रिलीज केलं तर लिलावासाठी 18 कोटी 75 लाख रुपये मिळतील.

करूण नायर आणि बेन डकेट

करूण नायरला 50 लाखांच्या बेस प्राईसवर दिल्ली कॅपिटल्सने घेतलं होतं. पण या पर्वात त्याने 2 डावात 18 धावा केल्या. तसेच पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाचे दोन झेल सोडले. त्यामुळे संघाचा पराभव झाला. दुसरीकडे, इंग्लंडच्या बेन डकेटने स्पर्धेपूर्वीच माघार घेतली होती. त्यामुळे त्याच्या जागी ऐनवेळी रेहान अहमदला घ्यावं लागलं होतं. त्याला एकही सामना खेळवला नाही. पण डकेट गेल्याने 2 कोटींची रक्कम पर्समध्ये जमा झाली. एकंदरीत बेरीज केली तर दिल्ली कॅपिटल्सच्या खात्यात 34.50 कोटी जमा होतील.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.