आजकाल डासांनी जवळजवळ प्रत्येकजण हैराण आहे. एकदा घरात डास झाले की त्यांच्यापासून पिच्छा सोडवणे फार मुश्कील होते. घर कितीही स्वच्छ केले तरीही नंतर घरात डास होतातच. त्यामुळे एक तर रात्री झोप होत नाही, यासह तुमची चीडचीडही होते.
परंतु घरातील डास घालवण्याचे काही खास उपाय आहेत. या उपायामुळे तुमच्या घरातील डास लगेच पळून जातील किंवा त्यांचा नायनाट होईल. विशेष म्हणजे डासांचा बंदोबस्त करण्यासाठी एक खास मशीन आहे. हे मशीन खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही.
डासांना म्हणजेच मच्छरांना तसेच अन्य छोट्या कीटकांना प्रकाश खूप आवडतो. मच्छर हे प्रकाशाच्या दिशेने जातात. त्यामुळेच याच प्रकाशाच्या मदतीने डासांना मारून टाकता येते. त्यासाठी यूव्ही ट्रॅप मशीनचा वापर करता येतो.
यूव्ही ट्रॅप मशीन ही मच्छरांना आकर्षित करते. तसेच मच्छरांना आपल्याकडे आकर्षित करून त्यांना मारूून टाकते. परंतु प्रत्येक प्रजातीच्या मच्छारावर ही मशीन काम करेलच असे नाही. हे मशीन चालवण्यासाठी विजेचाही वापर करावा लागतो.
अनेक मोठ्या ऑफिसेसमध्ये या मशीनचा वापर केला जातो. यलोब बग लाईटच्या मदतीनेही तुम्ही तुमच्या घरातील डासांना पळवून लावू शकता. यलो बग लाईट बल्ब घराबाहेर लावल्यास डास त्या बल्बकडे आकर्षित होतात.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.