१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. या दिवसानंतर भारत पूर्णपणे सार्वभौम असेल असे जाहीर करण्यात आले. पण भारतात अजूनही एक ठिकाण असे आहे जिथे युरोपियन ट्रस्टकडून कारभार केला जातो आणि भारतीयांना तिथे पुरेसे अधिकार नाहीत. अशी एक जागा मुंबईत आहे असे तुम्हाला सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण खरंच अशी एक जागा आहे.
दिल्ली जिमखाना क्लबच्या वादाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईचा प्रसिद्ध ब्रीच कँडी क्लबदेखील आता चौकशीच्या फेऱ्यात आला आहे. दक्षिण मुंबईच्या एका उच्चभ्रू परिसरात असलेला हा वसाहतकालीन क्लब आजही अशा नियमांनुसार चालतो, जे खरी सत्ता युरोपियन सदस्यांच्या हातात देतात. भारतीयांसाठी सदस्यत्व खुले असले तरी, निर्णय घेण्याचे अधिकार केवळ परदेशी विश्वस्त सदस्यांपुरतेच मर्यादित आहेत.
ब्रीच कँडी क्लबची स्थापना १८७८ मध्ये मुंबईत राहणाऱ्या युरोपियन लोकांसाठी झाली होती. त्या वेळी, तो केवळ ‘गोऱ्या लोकांसाठी’ असलेला क्लब मानला जात होता. स्वातंत्र्यानंतर, दबावामुळे १९६० च्या दशकात भारतीयांनाही सदस्यत्व देण्यात आले, परंतु क्लबची मूळ सत्ता संरचना कधीही पूर्णपणे बदलली नाही.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.