बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






बारसू येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. हा कोकणच्या अस्तित्वावर घाला आहे. कोकणावर विनाशकारी प्रकल्प लादण्याचा जेव्हा-जेव्हा प्रकार घडला, तेव्हा-तेव्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) स्थानिक ग्रामस्थांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. यावेळीही कोकणावर आलेले विनाशकारी अणुऊर्जाचे संकट परतवून लावू असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांनी दिला आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बारसू येथे अदानी पॉवरच्या माध्यमातून प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यानंतर कोकणात सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे, असे डोळस यांनी सांगितले. ते म्हणाले की, बारसू पंचक्रोशीवर आलेले हे नवीन संकटही स्थानिक ग्रामस्थ, शिवसेना पदाधिकारी आणि समस्त शिवसैनिकांच्या सहकार्याने परतवून लावल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. कोकणाला उद्योगांच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याचा कोणाचाही डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असा इशारा रवींद्र डोळस यांनी दिला आहे. ते म्हणाले की लवकरच राजापूर तालुकाप्रमुख कमलाकर कदम, तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधून पुढील रणनिती ठरवतील.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.