कर्नाटक क्राईम न्यूज : कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. जिल्ह्यातील गोविंदपूर (चडचण) येथे गोळीबाराची घटना घडली आहे. यामध्ये सहा जणांची हत्या झाल्याचे समोर आली आहे. ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जमिनीच्या वादातून सहा जणांची हत्या करण्यात आली आहे. एकाच वेळी सहा जणांची हत्या झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनास्तळी पोलीस दाखल झाले आहेत. या प्रकरणी अधिकचा तपास सुरु करण्यात आला आहे.
विजापूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर गावात शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या भीषण घटनेत सहाजणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, गोविंदपूर गावात निराळे आणि गुळगी (गोलगी) कुटुंबांमध्ये अनेक दिवसांपासून जमिनीच्या वादावरून संघर्ष सुरू होता. या जुन्या वैमनस्यातूनच हा रक्तरंजित हल्ला झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. माहितीनुसार, अज्ञात हल्लेखोरांनी गावात येऊन थेट गोळीबार केला. या थरारक हल्ल्यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये रेवणसिद्धप्पा निराळे, दुंडप्पा रेवणसिद्धप्पा निराळे, शिवपुत्र रेवणसिद्धप्पा निराळे, चंद्रशेखर निराळे, शब्बीर अत्तार यांच्यासह आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून, सीमाभागातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला असून, परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत.
या दुहेरी नव्हे तर सामूहिक हत्याकांडामुळे विजयपूर जिल्हा हादरला असून, भिमातीर परिसरात पुन्हा एकदा रक्तपाताची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा सुरू आहे. पोलिसांकडून अधिकृत माहिती आणि मृतांची संपूर्ण ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
नागपूर जिल्ह्यातील वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत दवलामेटी येथे धक्कादायक घटना घडली आहे. वृद्ध दाम्पत्याचा घरात कुजलेलं मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील दवलामेटी महाडा कॉलनी येथील कॉटर क्रमांक 91 येथे वृद्ध दाम्पत्य रहात असलेल्या घरातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरल्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले होते. घराच्या बेडरूम आणि स्वयंपाक खोलीमध्ये वृद्ध दांपत्याचे वेगवेगळे मृतदेह आढळल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
वृद्ध दाम्पत्य एकटेच त्या घरात राहत होते, त्यांची विवाहित मुलगी नागपुरातच दुसऱ्या भागात राहते. शनिवारी वृद्ध दाम्पत्यांनी मुलीशी अखेरचा संपर्क साधला होता. तेव्हापासून त्यांचं कोणाशीही बोलणं झालेलं नव्हतं किंवा परिसरातही ते कोणालाही भेटले नव्हते. आज दोघांचे मृतदेह आढळल्यामुळे विविध शक्यतांना बळ मिळाले आहे. मृतदेह कुजायला सुरुवात झाल्यामुळे दोन ते तीन दिवसांपूर्वी दोघांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. मृत्यूचे कारण आत्महत्या आहे की उष्माघात किंवा इतर आजारपणामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे हे वैद्यकीय तपासणीनंतर स्पष्ट होऊ शकणार आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करत घटनेचा तपास सुरू केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
आणखी वाचा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.