आमदार महेंद्र दळवी महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या आमदारांच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत. अशातच राजकीय घडामोडींना वेग आला. कोकणातील जागेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात राजकीय वातावरण तापल्यातं पाहायला मिळत आहे. ही जागा लढवण्यावर शिवसेना ठाम आहे. तर राष्ट्रवादी देखील ही जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे. यावरुनच शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. कोकणातील एकमेव जागेवर राष्ट्रवादीचा फाजील आत्मविश्वास असल्याचे दळवी म्हणाले. एकवेळ भाजपचा विचार करु मात्र राष्ट्रवादीला कदापी ही जागा देणार नाही असे दळवी म्हणाले. पालकमंत्री पद तुम्हाला आणि विधानपरिषद आम्हाला असं कदापी होणार नाही असे दळी म्हणाले.
पूर्वीपासून कोकण हा शिवसेनेचा कणा आहे. त्यामुळं आम्ही ही जागा राष्ट्रवादीला का द्यावी? असा सवाल दळवी यांनी केला. कितीही झालं तरी ही जागा शिवसेनेला मिळेल आणि आम्ही जिंकू सुद्धा. सुनील तटकरे यांना स्वतःच्या पक्षात अस्तित्व टिकवणं मुश्किलीचे झालं असताना त्यांनी या जागेवर दावा करणे हे निंदनीय असल्याचे दळवी म्हणाले. काहीही झालं तरी शिवसेना ही जागा लढवणार आहे. मंत्री भरत गोगावले हे आमचे मार्गदर्शक आणि चार टर्मचे आमदार आहेत. पालकमंत्री पद हे भरत गोगावले यांना मिळालेच पाहिजे. तो आमचा अधिकार आहे. राष्ट्रवादी उठावाचे काम आम्ही रायगड मधून केल्याचे दळवी म्हणाले. एकवेळ भाजपचा विचार करु मात्र राष्ट्रवादीला कदापी ही जागा देणार नाही असे दळवी म्हणाले. पालकमंत्री पद तुम्हाला आणि विधानपरिषद आम्हाला अस कदापी होणार नाही.
राष्ट्रवादीने कोकणातील विधान परिषदेची जागा मागणं हा त्यांचा मूर्खपणा आहे. सुनील तटकरेंची आतापर्यंतची भूमिका संशयास्पद राहिली आहे. सुनील तटकरेंनी आतापर्यंत जी भूमिका मांडली ती कोणीच मान्य केली नाही सुनील तटकरे यांना विचारात न घेता आम्ही उद्या या जागेवर अर्ज भरत आहोत असे दळवी म्हणाले.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आमचे वरिष्ठ नेते याबाबत विचार करतील. उदय सामंत, भरत गोगावले, योगेश सामंत याबाबत योग्य विचार करतील असे ते म्हणाले. शिवसेना म्हणून कोणालाही उमेदवारी दिली तरी त्याचे सन्मानाने काम करु. मुलगी की विकास गोगावले कोणाला असणार आमदार दळवींची पसंती असे विचारण्यात आले, यावेळी ते म्हणाले की, याबाबत आम्ही कोणाचा स्वाभिमान जपण्यासाठी मुलीच्या बाजूने लढणार आणि जिंकणार. सुनील तटकरेंचा हा अधुरा डाव आहे. सुनील तटकरे यांनी 1984 पासून आतापर्यंत रायगड मधील बनवाबनवी केली आहे. सुनील तटकरे यांची ही बनवाबनवी बघून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मतदार देखील त्यांना मतदान करणार नाही अशी टीका दळवींनी केली. कोकणाची कामे करण्यासाठी योग्य माणसाला कोकणवासिय संधी देईल. मागचे सरकार उलथवून लावताना जो प्रयत्न केला तोच निर्णय यावेळी घेतला जाईल असे ते म्हणाले.
आणखी वाचा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.