मुंबई : भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या तेजीनंतर शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये देखील घसरण झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील कराराबद्दलची अनिश्चितता यामुळं शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळाली. सेन्सेक्स सुरुवातीला 1300 अंकांनी घसरला होता. तर, निफ्टी 50 23485 अंकांपर्यंत खाली होता. मात्र नंतर, स्थिती थोडीशी सुधारली.
शेअर बाजारातील घसरणीमुळं सेन्सेक्स आणि निफ्टी 50 लाल रंगात बंद झाला. सेन्सेक्स 1092 अंकांनी घसरला आणि 74775.74 अंकांवर बंद झाला. तर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर निफ्टी 50 निर्देशांक 24 हजारांच्या पार गेला होता. त्यामध्ये पुन्हा घसरण झाली. निफ्टी 50 निर्देशांक 359 अंकांच्या घसरणीसह 23547.75 अंकांवर बंद झाला. याशिवाय बीएसई मिडकॅप 150 आणि बीएसई 250 स्मॉलकॅप निर्देशांक घसरणीसह बंद झाला.
शेअर बाजारातील घसरणीमुळं बीएसईचं बाजारमूल्य देखील घसरलं. बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 471 लाख कोटींवरुन घसरुन 465 लाख कोटींवर आले. म्हणजेच शेअर बाजारात आज गुंतवणूकदारांचं 6 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
निफ्टी 50 निर्देशांकापैकी 43 शेअर घसरणीसह बंद झाले. निफ्टीवर पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, इंटरग्लोब एव्हिएशन आणि ओएनजीसीच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली. तर, आयटी स्टॉक्सपैकी टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि विप्रोच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली.
गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात नफा वसूल करण्याचं धोरण स्वीकारत विक्री करणं, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अमेरिका आणि इराण यांच्यातील डीलला मंजुरी देण्यास होत असलेला विलंब, याशिवाय भारतातील मान्सूनसंदर्भात हवामान विभागाचा अंदाज यामुळं शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळाला. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष कमी होत असल्याचं चित्र समोर आल्यानं क्रूड ऑईलचे दर कमी होऊन 91 डॉलर प्रति बॅरलवर आला आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.