बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






दापोली तालुका हा पर्यटनदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा तालुका मानला जातो. दरवर्षी हजारो पर्यटक दापोलीतील समुद्रकिनारे, पर्यटनस्थळांचा आनंद घेण्यासाठी येथे येत असतात. त्यामुळे या ठिकाणी पर्यटन व्यवसायातून स्वयंरोजगार उपलब्ध तर झाला आहेच शिवाय कित्येक बेरोजगारांच्या हाताला आपल्या गावातच काम मिळाले आहे. एमटीडिसी मान्यता प्राप्त न्याहारी व निवास योजना, हॉटेल, रिसॉर्ट, पर्यटन संकुले आदी व्यवसाय उभारणीसाठी लाखो रुपयांचे विविध वित्तीय संस्था बॅका ,पतपेढया यांच्याकडून कर्ज उचलून अनेकांनी आपले व्यवसाय सुरू केले आहेत. अशा या पर्यटन व पर्यटन आधारीत व्यवसायाला महावितरणच्या सेवेतील गंभीर त्रुटींमुळेच कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.


गेल्या तीन महिन्यांपासून सतत खंडीत होणाऱ्या विजेच्या खंडीत प्रकाराने पर्यटन व फळ प्रक्रिया उदयोग चांगलेच अडचणीत आलेले आहेत. केवळ विदयुत महावितरणच्या सेवेतील त्रुटींमुळे सतत होणाऱ्या विजेच्या खंडीत प्रकाराने गेल्या तीन महिन्यांत पर्यटन व फळ प्रक्रिया उदयोगाचे झालेले कोट्यावधी रुपयांच्या नुकसानीची 7 दिवसांत उपाय योजना करण्यात आली नाही तर ग्राहक संरक्षण कायदा व एमईआरसी अंतर्गत कायदेशीर कारवाई व जन आंदोलन केले जाईल अशाप्रकारचा अंतिम आणि थेट इशाराच शुक्रवारी दापोली पर्यटन व्यवसायिक व फळ प्रक्रिया उद्योजक संघटना दापोलीच्या वतीने उप कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, उप विभागीय कार्यालय दापोलीचे अरविंद कुकडे आणि निलेश बेंडाळे या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून लेखी स्वरूपात निवेदन देऊन दिला आहे. यावेळी मंगेश मोरे, सचिन तोडणकर, दीपक विचारे, अज्ञानी वरवडेकर , विवेक भावे, शेखर कदम, बाळासाहेब नकाते, सुजल गाडगीळ, अभिजीत भोंगले, कडू, जोशी आदींसह लाडघर, मुरुड, कर्दे, पाळंदे, हर्णे, आंजर्ले येथील पर्यटन व फळ प्रक्रिया उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.