वुमन्स टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या अनुपस्थितीत आणि स्मृती मंधानाच्या नेतृत्वात इंग्लंडवर पहिल्या टी 20i सामन्यात दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाने यासह टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली. टीम इंडियाने इंग्लंडसमोर 189 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र इंग्लंडला 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 150 धावाच करता आल्या. टीम इंडियाने अशाप्रकारे सामना जिंकला. टीम इंडियाने यासह 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली. आता टीम इंडियाने ही आघाडी मजबूत करण्याची संधी आहे. इंग्लंड विरुद्ध इंडिया वुमन्स यांच्यातील दुसरा सामना हा 30 मे रोजी होणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका विजयाचा दावा आणखी मजबूत करण्याची संधी आहे. तर इंग्लंडचा हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न असणार आहे.






Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.