पुणे हुच शोकांतिका प्रकरण: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी हातभट्टीची दारू पिल्यामुळे अवघ्या दोन दिवसांत तब्बल 14 जणांचा मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. या भीषण विषारी दारू प्रकरणात (Hooch Tragedy) आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Amitesh Kumar) यांनी मोठी आणि कडक कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत हडपसर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) मुलानी यांना तडकाफडकी निलंबित (Suspension) करण्यात आले आहे.
पोलीस तपासातून या संपूर्ण प्रकरणाची अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी भागात तयार झालेली ही जीवघेणी हातभट्टीची दारू केवळ फुगेवाडीतच नव्हे, तर पुण्याच्या हडपसर भागातही मोठ्या प्रमाणावर विकली गेली होती.
ही विषारी दारू पिल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये 9 जणांचा, तर पुणे शहर परिसरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. जास्तीचा आर्थिक फायदा मिळवण्याच्या हव्यासापोटी योगेश वानखेडे या सराईत दारू विक्रेत्याने मूळ दारूमध्ये मोठ्या प्रमाणात घातक मिथेनॉल (Methanol) केमिकल मिसळले. दारूमध्ये मिसळण्यासाठी वापरण्यात आलेले हे मेथेनॉल ऑनलाइन मार्केटमधून बनावट ओळखपत्राच्या सहाय्याने खरेदी करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे.
उरळी कांचनमधील राधेशाम प्रजापती हा दारू तयार करण्याचे काम करतो.
प्रजापतीकडून योगेश वानखेडे हा दारू खरेदी करून वेगवेगळ्या गुत्त्यांवर विकतो.
वानखेडेनं अधिक नफ्यासाठी दारूत प्रमाणाबाहेर घातक मिथेनॉल केमिकल मिसळलं.
मिथेनॉलमुळे दारूचं प्रमाण दुप्पट झालं, पण त्याच वेळी ती अत्यंत विषारी बनली.
ही विषारी दारू वानखेडेनं फुगेवाडीतल्या विरका पितापुत्रांना विक्रीसाठी दिली.
हीच जीवघेणी दारू खडकीतल्या अग्रवाल आणि वडारवाडीतल्या धोत्रेलाही विकली गेली.
हडपसर व काळेपडळमधील आकाश जाधव आणि अशोक हांडेनंही ही दारू खरेदी केली होती.
पुण्यातील हडपसर येथील पांढरमळा भागातही या विषारी दारूमुळे निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी हडपसरमध्ये जाऊन पीडित कुटुंबांची भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात जात पोलिसांच्या एकूण कारभारावर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या बेकायदेशीर दारू विक्रीत स्थानिक पोलीस प्रशासनही आर्थिकदृष्ट्या सहभागी असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला. तसेच मृत पावलेल्या नागरिकांच्या वारसांना शासनाने प्रत्येकी 10 लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी हडपसरमधील अवैध दारूविक्रीच्या अड्ड्यांवर जोरदार तोडफोड केली.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.