सातारा क्राईम न्यूज : सातारा जिल्ह्यातील कराड शहरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. कराडमध्ये 95.78 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. तर 18 लाख 82 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कराड शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.


सुमारे 18 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


सातारा जिल्ह्यातील कराड शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल 95.78 ग्रॅम एमडी ड्रग्स हा अमली पदार्थ जप्त केला आहे. या प्रकरणी तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे 18 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये एमडीदक्ष एक इनोव्हा कार आणि मोबाईल फोनचाही समावेश आहे.. पोलिसांच्या गुप्त माहितीच्या आधारे वांरुजी फाटा परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे कराड शहरातील अमली पदार्थांच्या अवैध नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.


महत्वाच्या बातम्या:


महाराष्ट्र हजारो कोटींच्या ड्रग्ज तस्करीचा अड्डा होत असताना तमिळनाडूत फक्त 3 दिवसांत अँटी ड्रग्ज टास्क फोर्सने तब्बल 3,246 जणांच्या मुसक्या आवळल्या,12,650 सराईतांची झाडाझडती





आणखी वाचा



Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.