आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा षटकारांचा विक्रम काही नवीन नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हा विक्रम अनेकदा रचला गेला आहे, टी20 लीग स्पर्धेतही या विक्रमाची नोंद झाली आहे. सिक्सर किंग युवराज सिंगने ही कामगिरी 2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत केली होती. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर असा विक्रम अनेकदा रचला गेला आहे. आता या विक्रमात आणखी एक भर पडली आहे. नेपाळचा फलंदाज कुशल भुरटेल याने सहा षटकार मारले आहे. एकाच षटकात सहा षटकार मारणारा नेपाळचा दुसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी नेपाळच्या दीपेंद्र सिंह आरीने सहा चेंडूत सहा षटकार मारले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर युवराज सिंहच्या यादीत सहभागी झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अशी कामगिरी करणारा सहावा फलंदाज ठरला आहे.
चीनविरुद्धच्या सामन्यात रेकॉर्डनेपाळ आणि चीन यांच्यात 31 मे रोजी सिंगापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात हा सामना पार पडला. एशियन्स गेम्स मेन्स टी20 पात्रता फेरीत सहा षटकारांचा कारनामा घडला. नेपाळने प्रथम फलंदाज करताना 20 षटकात 2 गडी गमवून 313 धावा केल्या. यात कुशल भुरटेलने मोठी खेळी केली. कुशलने झुओ यूच्या नवव्या षटकात सहा षटकार मारले. त्या षटकात एका वाईडसह एकूण 37 धावा काढल्या. कुशल भुरटेलने 43 चेंडूत 129 धावा केल्या. त्याने 300च्या स्ट्राईक रेटने या धावा केल्या. दरम्यान, विजयी धावांचा पाठलाग करताना चीनचा संघ 92 धावांवर सर्वबाद झाला. नेपाळने हा सामना 221 धावांनी जिंकला.
View this post on Instagram
A post shared by CAN (@cricketassociationofnepal)
एका षटकात 6 षटकार मारणारे खेळाडू
An exclusive club welcomes Kushal Bhurtel 🤝
More here 📲 https://t.co/SgZbdZXzzx pic.twitter.com/0s1AKEBYu6
— ICC (@ICC) June 1, 2026
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेपाळने मोठा विक्रम नोंदवला आहे. हा विक्रम मोडणं खूपच कठीण आहे. या सामन्यात 300पेक्षा जास्त धावा करण्याची नेपाळ संघाची दुसरी वेळ होती. या धावसंख्येसह नेपाळने इतिहासही रचला आहे. टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दोनदा 300 पेक्षा जास्त धावा करणारा हा जगातील पहिला संघ ठरला आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.