बातमी शेअर करा :


































सामनाचे अनुसरण करा






रत्नागिरीतील परकार हॉस्पिटलच्या डायलिसिस विभागात सोमवारी सकाळी अचानक आग लागली. आग लागताच आयसीयू मधील रूग्णांना तात्काळ बाहेर काढून अन्य रूग्णालयात हलविण्यात आले. काही कालावधीनंतर हि आग विझवण्यात यश आले.


शॉर्ट सर्किट झाल्याने आगीचा भडका उडाला. आगीने डायलीसीस विभागात धुराचे प्रचंड लोण पसरल्याने अनेक वृद्ध रुग्ण गुदमरले. आग लागल्याचे कळताच रुग्णालयात एकच गोंधळ उडाला. येथील रुग्णांना कर्मचाऱ्यांनी तत्काळ बाहेर काढत अन्य रुग्णालयात हलवले. आग आटोक्यात आणण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. परकार हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची बातमी पसरताच रूग्णांच्या नातेवाईकांनी रूग्णालयात धाव घेतली. परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.







Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.