Mumbai Accident News : मुंबईतील दहिसरमध्ये भीषण अपघाताची घटना घडली आहे. घरटन पाडा नंबर दोन हायवेवर हा मोठा अपघात झाला आहे. अती वेगाने जाणाऱ्या रिक्षाचा बसला ओव्हरटेक करताना अपघात झाला आहे. डिव्हाइडवर रिक्षा धडकल्याने हा मोठा अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
मात्र अद्याप याला पोलिसांकडून दुजोरा नाही. अपघात झाल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. सध्या दहिसर पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून घटनास्थळावर जाऊन वाहतूक कोंडी सोडवण्याचे काम सुरु केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर झालेल्या अत्यंत भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत झाला. दुचाकी आणि टेम्पोची धडक झाल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याने अवघं हसत खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त झालं. या भीषण अपघातामध्ये दीपक चांदे (वय 39), त्यांची पत्नी शोभा (वय 35) त्यांची दोन मुले जय (वय 10) आणि मुलगी पूर्वा (वय 7) यांचा जागीच मृत्यू झाला. चांदे कुटुंबीय वास्तव्यास मुंबईत आहे. मात्र, सुट्टीचा महिना असल्याने गावी आले होते. दीपक चांदे यांनी मुंबईत मेहनत करत आजरा तालुक्यातील व्होन्याळी गावामध्ये घर बांधलं होता. सुट्टी संपत आल्याने त्यांनी मुंबईकडे उद्या (5 जून) जाण्यापूर्वी पाहुण्यांच्या भेटीसाठी दुंडगे गावी जात होते. मात्र, आयशर ट्रेम्पोने दिलेल्या धडकीत अवघ्या कुटुंबाचा जागीच अंत झाला.
दीपक चांदे यांनी गावी घर बांधल्यानंतर गावी येण्याचा बेत केला. सर्वजण उन्हाळी सुट्टीसाठी गावी आले होते. नवीन घर बांधून पूर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी संपूर्ण कुटुंब मुंबईहून गावाकडे आले होते. सुट्टी संपत आल्याने उद्या मुंबईला परत जाणार होते. मात्र त्याआधी पाहुण्यांना भेटीसाठी दुचाकीवरून दुंडगे गावी निघाले होते. मात्र, मध्येच टेम्पोची धडक बसल्याने चौघेही जागीच मृत पावले. अपघातस्थळी अंगावर शहारे आणणारे दृश्य होते. अपघातानंतर आयशर टेम्पो रस्त्याला लागून असलेल्या नाल्यामध्ये पलटी झाला. या पलटी झालेल्या आयशर टेम्पोखाली दोन चिमुरड्या जीवांचा देह निपचित पडला होता. अपघातानंतर जमलेला गर्दीने टेम्पो हलवून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंतर जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो बाहेर काढण्यात आला.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.