घनसावंगी - भुतेगाव, ता. घनसावंगी येथील दुधना नदीच्या पात्रामध्ये जी सीबीच्या साह्याने वाळू उत्खनन करीत असताना घनसावंगी पोलिसांच्या पथकाने गुरुवार (ता. चार) सकाळी कारवाई करून आठ हायवा व तीन जीसीबी जप्त करून सबंधीत अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भुतेगाव, ता. घनसावंगी शिवारातील दुधना नदीपात्रामध्ये काही इसम हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जी सी बी मशीन व हायवा टिपरद्वारे अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुक करित असल्याच्या कारणावरून पोलीस निरीक्षक केतन राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात, उपनिरीक्षक किरण पवार, भीमराव राठोड, रणजित वैराळ, बाबासाहेब गोल्डे, गंगाराम कदम, प्रकाश पवार, उमेश राठोड, संतोष एसलोटे, सुरेश राठोड, प्रल्हाद नागलोत, बाबासाहेब खटावकर, सर्जेराव तिकांडे, सुमित साळुंके यांच्या पथकाने गुरुवार (ता. चार) भुतेगाव शिवारातील दुधना नदीपात्रात अंदाजे 09.15 वाजेच्या सुमारास छापा टाकून दुधना नदीपात्रामध्ये काही इसम हे 03 जेसीबी मशीनच्या मदतीने 08 हायवा टिपरमध्ये वाळुची/रेतीची दुधना नदीपात्रातुन अवैधरित्या उत्खन्न करुन भरतांना दिसुन आले.


सदर ठिकाणी तात्काळ छापा मारुन सदरच्या 03 JCB मशीन व 08 हायवा टिपर तसेच त्यांचे चालकांना ताब्यात घेवुन सदरचे 08 हायवा टिपर व त्यात प्रत्येकी एक ते पाच ब्रास वाळु असे एकूण 12 ब्रास वाळू व 03 JCB मशीन असा एकूण तीन कोटी 45 लाख 55 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त करून पोलिस स्टेशन घनसावंगीच्या परिसरामध्ये लावण्यात आला आहे.


या प्रकरणी गजानन चंद्रभान नेमाणे (वय-35 वर्षे) रा. सामनगाव, ता. जि. जालना, पांडुरंग विष्णु कुरधणे (वय-35 वर्षे) रा. गाढे सावरगाव, ता. घनसावंगी, संतोष अशोक शिंदे (वय-40 वर्षे) रा. पिरपिंपळगाव, ता. जि. जालना, जावेद रसिद शेख (वय-28 वर्षे) रा. गुंडेवाडी, ता. जि. जालना, प्रविण दादाराव खिल्लारे (वय-25 वर्षे) रा. वाकुळणी, ता. बदनापुर, विलास विष्णु कोल्हे (वय-28 वर्षे) रा. पिरपिंपळगाव, ता. जि. जालना, सचिन अनिल साळवे (वय-21 वर्षे) रा. शास्त्री मोहल्ला जुना जालना, कृष्णा उर्फ किशोर आत्माराम लोहकरे (वय-27 वर्षे) मांग देऊळगाव, ता. बदनापुर, जेसीबी मालक प्रकाश आण्णा पवार (वय-30 वर्षे) रा. जांमवाडी, श्रीकृष्ण नगर, ता. जि. जालना, संदीप देविदास पाडमुख (वय-29 वर्षे) रा. खरपुडी, ता. जि. जालना, धम्मकिरण एकनाथ ठोकळे (वय-39 वर्षे) रा. धनगर पिंप्री, ता. अंबड यांच्या विरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.