Shashi Tharoor on Sarfaraz Khan: काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मुंबईचा प्रथम-श्रेणी फलंदाज सरफराज खानला (Shashi Tharoor on Sarfaraz Khan) भारतीय संघातून वगळल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी बीसीसीआय आणि निवड समितीच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका पोस्टमध्ये त्यांनी बीसीसीआय, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. थरूर यांनी पोस्टमध्ये सरफराजला टॅगही केले आहे.


सरफराज खानला वगळल्याने मला आश्चर्य वाटले


थरुर म्हणाले, "श्रीलंका दौऱ्यासाठीच्या इंडिया 'अ' संघातून मुंबईचा फलंदाज आणि कसोटी फलंदाज सरफराज खानला वगळल्याने मला आश्चर्य वाटले आहे. कसोटी संघाबाहेर त्याच्यापेक्षा चांगला फलंदाज आहे का? त्याच्या प्रथम-श्रेणी विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही. निवड समिती याचे समर्थन कसे करू शकते?"






निवड समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह 


थरूर यांनी यापूर्वीही संघ निवडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि भारतीय संघाच्या निवडीवर आपली मते उघडपणे व्यक्त केली आहेत. यापूर्वी, जुलै 2024 मध्ये जेव्हा भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर होता, तेव्हा एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा करण्यात आली होती. एकदिवसीय मालिकेत शतक झळकावूनही संजू सॅमसनला संघातून वगळण्यात आले होते. इतकेच नाही तर, झिम्बाब्वेविरुद्ध उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अभिषेक शर्मालाही संधी न दिल्याबद्दल टीका केली होती. 


ध्रुव जुरेलकडे इंडिया 'अ' संघाची कमान


श्रीलंका दौऱ्यासाठी निवडलेल्या इंडिया 'अ' संघात ध्रुव जुरेल (कर्णधार), देवदत्त पडिक्कल (उपकर्णधार), साई सुदर्शन, आयुष पांडे, ऋतुराज गायकवाड, शेख रशीद, हर्ष दुबे, अंशुल कंबोज, सारांश जैन, गुरनूर ब्रार, एन. जगदीसन (यष्टीरक्षक), अमन मोखाडे, आकिब नबी, यश ठाकूर आणि झीशान अन्सारी यांचा समावेश आहे. सरफराजला संघात स्थान देण्यात आलेले नाही.



इतर महत्वाच्या बातम्या


Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.