म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना परताव्यासोबतच (Returns) आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे 'कामगिरीतील सातत्य' (Performance Consistency). शेअर्स बाजारातील चढ-उतारांमध्येही जो फंड सातत्याने चांगली कामगिरी करतो, तिथे गुंतवणूकदारांचा पैसा अधिक सुरक्षित राहतो.
'शेअर.मार्केट बाय फोनपे' (Share.Market by Phonepe) च्या मार्च २०२६ च्या तिमाही रिपोर्टनुसार, गेल्या ५ वर्षांत ९ लार्जकॅप म्युच्युअल फंडांनी कामगिरीच्या सातत्यामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. जर तुम्ही २०२६ मध्ये मोठ्या कंपन्यांमध्ये (Large Cap) सुरक्षित विचार करत असाल, तर या फंडांचे विश्लेषण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
लार्जकॅप फंडांची ५ वर्षांतील कामगिरीखालील तक्त्यामध्ये या ९ फंडांचे सातत्य, त्यांचा ५ वर्षांतील वार्षिक परतावा (CAGR) आणि सध्या त्यांचे व्यवस्थापन असलेले एकूण भांडवल (AUM) दिले आहे:
फंडांची गुंतवणूक शैली (Investment Style) आणि वैशिष्ट्येप्रत्येक फंडाची शेअर्स निवडण्याची पद्धत वेगळी असते. या यादीतील काही प्रमुख फंडांची रणनीती खालीलप्रमाणे आहे:
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल आणि निप्पॉन इंडिया (आघाडीचे फंड)
आयसीआयसीआय प्रुडेन्शियलने ९७% गुणांसह सातत्यामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. तर निप्पॉन इंडियाने सर्वाधिक म्हणजे १४.९९% परतावा दिला आहे. या दोन्ही फंडांची जोखीम स्पर्धक फंडांच्या (Peers) तुलनेत योग्य मर्यादेत आहे.
हाय व्हॅल्यू (Value-Based) स्टाईल:
डीएसपी (DSP) आणि एचडीएफसी (HDFC) हे फंड प्रामुख्याने 'व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग'वर भर देतात. म्हणजे सध्या स्वस्त असलेल्या पण असलेल्या शेअर्समध्ये हे जास्त गुंतवणूक करतात.
हाय मोमेंटम (Momentum-Based) स्टाईल:
इन्व्हेस्को, बंधन आणि जेएम लार्जकॅप हे फंड सध्या बाजारात वेगाने धावणाऱ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. मात्र, इन्व्हेस्को फंडाची जोखीम सध्या इतर फंडांच्या तुलनेत खूप जास्त नोंदवली गेली आहे.
हाय क्वालिटी (Quality-Based) स्टाईल
एसबीआय ( SBI ) लार्जकॅप फंड हा मजबूत मॅनेजमेंट आणि कर्जमुक्त असलेल्या अतिशय दर्जेदार कंपन्यांच्या शेअर्सला प्राधान्य देतो.
तुमच्यासाठी योग्य काय?जर तुम्ही मध्यम ते दीर्घकालीन (५ वर्षे किंवा अधिक) कालावधीसाठी गुंतवणूक करत असाल आणि तुम्हाला बाजारातील जास्त जोखीम नको असेल, तर लार्जकॅप फंड हा सर्वोत्तम पर्याय असतो.
या विश्लेषणावरून असे दिसते की, ICICI Prudential आणि Nippon India हे दोन फंड केवळ परतावा देण्यातच नाही, तर बाजारातील पडझडीतही स्वतःला टिकवून ठेवण्यात (Consistency) सर्वात यशस्वी ठरले आहेत. गुंतवणूक करताना केवळ जास्त परतावा न पाहता, फंडाची जोखीम (Risk) आणि त्याचे सातत्य तपासूनच एसआयपी (SIP) किंवा एकरकमी गुंतवणूक सुरू करावी.
-
(Disclaimer- वरील लेखातील आकडेवारी आणि तपशील फक्त माहितीसाठी देण्यात आले असून, यामध्ये कोणत्याही प्रकारचा गुंतवणूक सल्ला किंवा शिफारस नाही. कोणत्याही गुंतवणुकीसाठी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.