देवळाई तांडा येथील तलावात दुर्दैवी घटना
तीन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू
तिघांच्या मृत्यूने देवळाई तांडा परिसरात हळहळ
छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या देवळाई तांडा परिसरातील साई टेकडी येथील तलावात शनिवारी सायंकाळी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. पोहण्यासाठी गेलेल्या पाच मुलांपैकी तीन अल्पवयीन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. तर दोन मुलांना सुदैवाने जीव वाचला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिघांच्या जाण्याने नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या देवळाई तांडामध्ये साई टेकडी तलावात पाच मुले पोहण्यासाठी गेली होती. पोहत असताना अचानक त्यांचा पाण्यातील तोल गेल्याने सर्व मुले अडचणीत सापडली. यापैकी दोन मुले जीव वाचवण्यात यशस्वी झाले. मात्र तीन मुले खोल पाण्यात बुडाली.
मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगरघटनेची माहिती नगरसेवक मोहित त्रिवेदी यांनी अग्निशमन नियंत्रण कक्षाला दिल्यानंतर तात्काळ पद्मपुरा मुख्य अग्निशमन केंद्र आणि कांचनवाडी अग्निशमन केंद्राचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तलावात शोधमोहीम राबवून बुडालेल्या तिन्ही मुलांना बाहेर काढले. त्यानंतर मुलांचे मृतदेह चिकलठाणा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
रत्नागिरीतील आरे समुद्रकिनारी कोल्हापूरचे दोघे विद्यार्थी बुडाले, एकाचा मृत्यूमृत मुलांची नावे हाती आले आहेत. विशाल मच्छिंद्र घुले (वय १५ वर्षे), आदर्श गौतम इंगोले (वय १५ वर्षे), यश ज्ञानेश्वर बरंबाईल (वय १६ वर्षे) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. हे तिन्ही मुले सातारा परिसरातील लक्ष्मी कॉलनी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
Contact to : xlf550402@gmail.com
Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.