माळेगाव - माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाने सालाबादप्रमाणे यंदाही दोनशे रुपये प्रति टन खोडकी (कांडे) पेमेंट जाहीर केले. माळेगाव कारखाना अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत वरील धोरणात्मक निर्णय घेण्यात आला.


जून महिन्यामध्ये नवीन ऊस लागवड करण्यासाठी व शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला प्रति टन दोनशे रुपये खोडकी पेमेंट देण्याची माळेगावची परंपरा आहे, ती परंपरा सुनेत्रा पवार यांनी कायम ठेवली, परिणामी माळेगावच्या सभासद शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्षा  सौ. संगिता कोकरे, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे , माळेगावचे कार्यकारी संचालक अशोक पाटील आदी पदाधिकारी उपस्थितीत होते.


दरम्यान, माळेगावच्या प्रशासनाने गत वर्षी गाळप झालेल्या उसाला एफआरपी ३२६९ असतानाही प्रति टन ३३०० रुपये शेतकऱ्यांना अदा केलेले आहेत. आता नविन गळीत हंगामाच्या तोंडावर २०० रूपये कांडे पेमेंट शेतकर्यांना मिळणार आहे, अशी माहिती उपाध्यक्षा सौ. संगीता कोकरे, संचालक बाळासाहेब तावरे नितीन सातव, विजय तावरे, नितीन शेंडे  यांनी दिली.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.