परळी वैजनाथ - पवित्र अधिकमासानिमित्त मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील चौरागड (छोटी बाजार) येथील भाविकांनी देशभरातील पाचवे ज्योतिर्लिंग म्हणून शिवभक्तात ओळख असलेल्या परळी वैजनाथ येथील श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंग मंदिरास 151 किलो चांदीचा भव्य त्रिशूल शुक्रवारी (ता. 6) दुपारी विधिवत पूजा करून अर्पण केला.


या गावातील पंचकमिटीने बडी माता श्रीराम मंदिर यांच्या सहकार्याने देशभरातील बाराही ज्योतिर्लिंग मंदिरांना असा त्रिशूल अर्पण करण्याचा संकल्प केला आहे. यापूर्वी त्यांनी श्री केदारनाथ यासह महाकाल, ओंकारेश्वर,त्रिंबकेश्वर, सोमनाथ, नागेश्वर आदी ज्योतिर्लिंग मंदिरांना असा त्रिशूळ अर्पण केला आहे.


हा त्रिशूल सुमारे 15 फूट उंच व पाच फूट रुंदीचा असून, त्याची बनावट खूपच सुंदर करण्यात आली आहे. त्यावर नक्षीकामही छान केले गेले आहे. विशेष वाहनाने हा त्रिशूल मध्य प्रदेशातून येथे आणण्यात आला. येथे आल्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास त्याची विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या जयघोषात श्री वैद्यनाथ देवस्थान संस्थेकडे हात्रीशूळ सुपूर्द करण्यात आला.


देवस्थान संस्थेचे व्यवस्थापक श्रीपाद कुलकर्णी यांनी हा त्रिशूल स्वीकारला. यावेळी चौरागड पंचकमिटीचे सदस्य विदित साहू, बंटी द्विवेदी, अशोक जैन, सौरभचौरसिया, टिंकल चरणागर, कुशल शुक्ला, सुभाष साहू, पिंटू द्विवेदी, मयंक चौरसिया, अभिषेक गोयल, अनुज चौरसिया, नितिन चौरसिया, मोनू गडकरी, विक्रांत ताम्रकार, गौरव चौरसिया,गोलू बैस, आशु चौरसिया, हर्षित विश्वकर्मा, अमित राजपूत, कृष्णा ताम्रकार, अमन बाबा, मोनू, अपू सोनी, गौरव सोनी गोलू, वियोम, अथर्व द्विवेदी, छोटू ठाकुर, गगन सोनी, नन्दू घनघोरिया तसेच देवस्थान संस्थेचे पुजारी कर्मचारी भानुदास देशमुख, दत्ता दहिभाते, श्री जोशी, भाविक उपस्थित होते.

Contact to : xlf550402@gmail.com


Privacy Agreement

Copyright © boyuanhulian 2020 - 2023. All Right Reserved.